घरक्रीडाIPL 2022 : "लपून क्रिकेट खेळायचो..."; RCB च्या आकाशदीपनं सांगितला आयपीएलपर्यंतचा प्रवास

IPL 2022 : “लपून क्रिकेट खेळायचो…”; RCB च्या आकाशदीपनं सांगितला आयपीएलपर्यंतचा प्रवास

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगने (आयपीएल) आतापर्यंत अनेक खेळाडुंना घडवत भारतीय क्रिकेट संगात प्रवेश मिळवून दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी देशातील अनेक खेळाडू स्पर्धेत आहेत. मात्र काही खेळाडूंचा आयपीएलचा पर्यंतचा प्रवास खुपच खडतर ठराल आहे.

इंडियन प्रिमीयर लीगने (आयपीएल) आतापर्यंत अनेक खेळाडुंना घडवत भारतीय क्रिकेट संगात प्रवेश मिळवून दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी देशातील अनेक खेळाडू स्पर्धेत आहेत. मात्र काही खेळाडूंचा आयपीएलचा पर्यंतचा प्रवास खुपच खडतर ठराल आहे. अशाच एक खेळाडू म्हणजे आकाशदीप. मात्र आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कशाप्रकारे अडचणींचा सामना करावा लागला याचा खुलासा आकाशदीपनं एका व्हिडीओमधून केला आहे. आरसीबीनं त्याचा हा प्रवास आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

आकाशदीप हा सध्या रॉलय चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB) गोलंदाजी करताना चांगली कामगिरी करत आहे. आरसीबीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये आकाशदीपनं त्याचा आयपीएलपर्यंतचा खडतर प्रवास सांगितला आहे. “माझे वडिल एक शिक्षक होते आणि क्रिकेटसाठी त्यांनी कधीही पाठींबा दिला नाही. परंतु ते जेव्हा शाळेत जायचे तेव्हा मी लपून क्रिकेट खेळायचो,” असं आकाशदीप म्हणाला.

- Advertisement -

परंतु यामागे एक कारण असल्याचंही त्यानं सांगितलं. “जेव्हा माझ्या वडिलांना मी क्रिकेट खेळत असल्याची माहिती झाली, तेव्हा त्यांना माझ्या भविष्याबद्दल चिंता वाटू लागली. मी ज्या ठिकाणाहून आलो आहे, त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी क्रिकेट खेळलंय त्यांना यश मिळालं नाही. मी क्रिकेट खेळायचो तेव्हा ते नाराज व्हायचे. याकडे एक गुन्हा म्हणून पाहिलं गेलं,” असंही त्यानं म्हटलं.

- Advertisement -

कुटुंबीयांकडून पाठींबा नसतानाही आकाशदीपनं क्रिकेट खेळणं सोडलं नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यानं आपला आरसीबीपर्यंतचा प्रवास केला. विराट कोहली, एबी डे विलिअर्स या खेळाडूंमुळेच आपलं कायम आरसीबीसोबत खेळण्याचं स्वप्न राहिलं असल्याचंही त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं.


हेही वाचा – ICC Meeting: ICC च्या कमिटीत जय शाहांची एन्ट्री; PCB अध्यक्ष रमीझ राजा यांना झटका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -