ENG VS IND 5TH TEST : भारतीय संघाला मोठा धक्का, आणखी एकाला कोरोनाची लागण

ENG VS IND 5TH TEST : भारतीय संघाला मोठा धक्का, आणखी एकाला कोरोनाची लागण

आणखी एकाला कोरोनाची लागण

इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. जिथे मालिका शेवटच्या घटकावर आहे, तिथे पुन्हा एकदा टीम इंडियावर कोरोनाची सावली घिरट्या घालताना दिसत आहे. टीम इंडियाचा एक सपोर्ट स्टाफ कोविड -१९ पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यामुळे संघाला सामन्यापूर्वी सराव सत्र रद्द करावे लागले. भारतीय संघ या मालिकेचा अंतिम सामना शुक्रवारी मँचेस्टरमध्ये यजमान इंग्लंडविरुद्ध खेळनार आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे कनिष्ठ फिजिओ योगेश परमार यांची कोविड -१९ चाचणी सकारात्मक आली आहे, ज्यामुळे शुक्रवारपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटीपूर्वी संघाला सराव सत्र रद्द करावे लागले. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला या घटनेची माहिती दिली आणि अंतिम कसोटीवर नवीन संकट आले आहे.

टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना अलीकडेच कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने ते आधीच विलगिकरणात आहेत. त्यांच्याशिवाय क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि फिजीओ नितीन पटेल हे देखील लंडनमध्ये विलगिकरणात आहेत.

अशा परिस्थितीत आता फक्त फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड टीम इंडियासोबत आहेत. संघातील अनेक सदस्य कोरोनाच्या कचाट्यात आले असल्याने शेवटच्या आणि महत्वाच्या सामन्यावर कोरोनाच्या या संक्रमनामूळे सामना रद्द देखिल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना १० सप्टेंबरपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाईल. सध्या भारतीय संघ सध्याच्या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे आणि इंग्लंड संघाने पाचवा सामना जिंकला तरी मालिका त्यांच्या हातात राहणार नाही आणि सामना बरोबरीत सुटेल. तसे, ज्या फॉर्ममध्ये टीम इंडिया दिसत आहे, ते बघून फक्त टीम इंडियाचे पारडे जड दिसते.


हेही वाचा : “दादा” झळकणार बॉलीवूड पडद्यावर, गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

US OPEN 2021 : जोकोव्हिच यूएस ओपनच्या उंपांत्य फेरीत

First Published on: September 9, 2021 6:34 PM
Exit mobile version