वेस्ट इंडिजच्या ‘या’ दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

वेस्ट इंडिजच्या ‘या’ दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गज खेळाडू लेंडल सिमन्स आणि दिनेश रामदिन यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सोमवारी या दोन्ही खेळाडूंनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. वेस्ट इंडिजचा फलंदाज दिनेश रामदिनने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. (Cricketer Lendl Simmons And Dinesh Ramdin Retires From International Cricket)

दोन्ही खेळाडू बराच काळ संघाबाहेर

लेंडल सिमन्स आणि दिनेश रामदिन हे दोन्ही खेळाडू बराच काळ संघाबाहेर होते. त्यामुळे सिमन्स आणि रामदिन यांचे वेस्ट इंडिज संघात पुनरागमन करण्याचे दरवाजेही जवळपास बंद झाले होते. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली.

दिनेश रामदिनने वेस्ट इंडिजकडून 74 कसोटी सामन्यात 2898 धावा केल्या आहेत. त्याशिवाय त्याने 139 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2200 धावा आणि 71 टी-20 मध्ये 636 धावा केल्या आहेत.

लेंडल सिमन्सने वेस्ट इंडिजसाठी 8 कसोटीत 278 धावा, 68 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1958 धावा आणि 68 टी-20 सामन्यांमध्ये 1527 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रत्येकी एक विकेट घेतली आहे, तर टी-20 मध्ये त्याने सहा विकेट्स घेतल्या आहेत.

लेंडल सिमन्सने 2016 टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सर्वोत्तम खेळी केली होती. त्याने 51 चेंडूत 82 धावा केल्या आणि भारतीय संघाला टी-20 विश्वचषकातून बाहेर काढले. यानंतर कार्लोस ब्रॅथवेटने बेन स्टोक्सच्या एका षटकात चार षटकार मारत वेस्ट इंडिज संघाला दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवले.

सिमन्सने आयपीएलमध्येही अनेक उत्तम खेळी केली आहेत. सिमन्स हा मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्याशिवाय, तो वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये कराची किंग्स, ब्रिस्बेन हीट, त्रिनबॅगो नाइट रायडर्स संघाचा देखील भाग होता.

यष्टिरक्षक फलंदाज दिनेश रामदिन टी-20 लीगमध्ये विशेष काही करू शकला नसून, तो आयपीएलमध्येही खेळला नाही. पण त्याने कसोटीत अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या. यामध्ये 4 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.


हेही वाचा – आर माधवानचा मुलगा वेदांतची अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रीय विक्रमाला गवसणी

First Published on: July 19, 2022 12:14 PM
Exit mobile version