आर माधवानचा मुलगा वेदांतची अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रीय विक्रमाला गवसणी

बॉलीवूड अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन याने ४८ व्या ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली आहे. आर माधवनने याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केली आहे.

Vedant Madhwan

बॉलीवूड अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन याने ४८ व्या ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली आहे. आर माधवनने याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांने मुलाच्या विक्रमाची माहिती दिली आहे.

माधवनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वेदांत स्विमिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “कधीही नाही नका म्हणू … १५०० मीटर फ्रि स्टाइल राष्ट्रीय ज्युनियर रेकॉर्ड वेदांतने मोडला आहे”, असे त्याने लिहिले आहे. दरम्यान, सुमारे १६ मिनिटांत वेदांतने अद्वैत पेजचा ७८० मीटरचा विक्रम मोडीत काढल्याचे समालोचकांचे म्हणणे आहे.

वेदांतने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्रासाठी एकूण ७ पदके जिंकली होती. बंगळुरू येथील बसवानगुडी अॅक्वाटिक सेंटर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत त्याने ४ रौप्य आणि ३ कांस्यपदके जिंकली.

वेदांतने ८०० मीटर फ्री स्टाईल स्विम, १५०० मीटर फ्री स्टाईल स्विम, ४×१०० मी फ्री स्टाईल पोहणे आणि ४×२०० मीटर फ्री स्टाईल जलतरण रिले इव्हेंटमध्ये रौप्य पदके जिंकली आहेत. शिवाय, १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटर फ्री स्टाइल जलतरण प्रकारात कांस्यपदक जिंकले.

वेदांतच्या या विजयानंतर अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आर माधवनचे अभिनंदन केले होते. त्याशिवाय मुलाच्या चांगल्या संगोपनाबद्दलही माधवनचे कौतुक करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत वेदांत म्हणाला होता की, ‘मला माझ्या वडिलांच्या सावलीत राहायचे नव्हते. मला स्वतःसाठी नाव कमवायचे होते. मला फक्त आर माधवनचा मुलगा व्हायचे नव्हते. माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. तो नेहमी माझी काळजी घेतो. दोघेही खूप मेहनत करतात. माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी खूप त्याग केले आहेत, दुबईला शिफ्ट होणे हा त्यापैकी एक आहे.

दरम्यान, आर माधवन सध्या त्याच्या ‘रॉकेट्री द नंबी इफेक्ट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. आता नुकताच त्याचा आनंद अभिनेत्याचा मुलगा वेदांत याने द्विगुणित केला आहे. वास्तविक, वेदांतने ४८व्या ज्युनियर नॅशनल एक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडला आहे.


हेही वाचा – शिवसेनेला अजून एक झटका, शिवसेना नेते रामदास कदम यांचा राजीनामा, शिंदेगटात जाणार?