Commonwealth Games 2022 : भारतीय कुस्तीपटू अंतिम फेरीत दाखल; 4 रौप्यपदके निश्चित

Commonwealth Games 2022 : भारतीय कुस्तीपटू अंतिम फेरीत दाखल; 4 रौप्यपदके निश्चित

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय कुस्तीपटूंनी आक्रमक खेळी केली आहे. भारताच्या पुरुष आणि महिला कुस्तीपटू कमाल फॉर्ममध्ये आहेत. पुरुषांमध्ये बजरंग पुनिया, दीपक पुनियातर महिलांमध्ये साक्षी मलिक आणि अंशू मलिक यांनी थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. (deepak punia bajrang punia sakshi malik anshu malik in final of freestyle wrestling for india in commonwealth games 2022)

या चार कुस्तीपटूंच्या आक्रमक खेळीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला चार रौप्यपदके निश्चित झाली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत शुक्रवारी भारताचे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी पहिले सामने जिंकले आहेत. बजरंगने नॉरूच्या लॉवे बिंघमला 4-0 अशा फरकाने पराभूत केले.

दीपक पुनियाने न्यूझीलंडच्या मॅथ्यूला 10-0 च्या फरकाने पराभूत केले. त्यानंतर पुरुषांच्या 65 किलोग्राम फ्रीस्टाइल गटात बजरंगने याआधी उपांत्यपूर्व फेरीत मॉरीशसच्या कुस्तीपटूला आणि नंतर उपांत्य फेरीत तांत्रिक श्रेष्ठतेनुसार इंग्लंडच्या जॉर्ज रॅमला मात देत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

दीपकने याआधी 6-0 च्या फरकाने उपांत्यपूर्व फेरी जिंकली आहे. तसेच, उपांत्य फेरीमध्ये कॅनडाच्या अॅलेक्झांडर मूरेला 3-1 च्या फरकाने पराभूत केले. अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. पुरुषांसह महिला कुस्तीपटूंनी देखील कमाल कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

याशिवाय, अंशू मलिक आणि साक्षी मलिक यांनी अंतिम फेरीत पोहोचत रौप्यपदक निश्चित केले आहे. फ्री स्टाईल 62 किलोग्राम गटात साक्षीने इंग्लंडच्या विजय मिळवला. तसेच, 57 किलोग्राम वजनी गटात अंशूने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

भारतीय खेळाडूंची चांगली कामगिरी

राष्ट्रकुल स्पर्धा (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करत तब्बल 20 पदकं खिशात घातली आहेत. यामध्ये 6 सुवर्णपदकांचाही समावेश आहे. यामुळे गुणतालिकेत (Pointtable) भारत टॉप 10 मध्ये असून ताज्या आकडेवारीनुसार भारत सातव्या स्थानी विराजमान आहे.

याशिवाय, स्पर्धेच्या सुरुवातीपासून दमदार कामगिरी करत अव्वलस्थानी असणारा ऑस्ट्रेलिया आताही 132 पदकांसह अव्वलस्थानी आहे. त्यानंतर इंग्लंड 118 पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे.


हेही वाचा – Commonwealth Games 2022 : सुरक्षेसाठी कुस्तीचा सामना मध्येच थांबवला; स्टेडियमही केले रिकामे

First Published on: August 5, 2022 10:01 PM
Exit mobile version