इंग्लंड संघाचा पाकिस्तान दौरा; सुरक्षेसाठी हेलिकॉप्टरमधून देखरेख, दुकाने, कार्यालये बंद

इंग्लंड संघाचा पाकिस्तान दौरा; सुरक्षेसाठी हेलिकॉप्टरमधून देखरेख, दुकाने, कार्यालये बंद

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी इंग्लंडचा संघ पाकिस्तानात दाखल झाला आहे. इंग्लंडचा पाकिस्तान दौरा असून, पाकिस्तानात दाखल झाल्यानंतर इंग्लंडच्या संघासाठी पाकिस्तानने तगडा बंदोबस्त ठेवला आहे. इंग्लंडचा हा तब्बल 17 वर्षानंतर पहिला पाकिस्तान दौरा आहे. यापूर्वी इंग्लंडचा क्रिकेट संघ पाकिस्तानात सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यास नकार देत होता. (England Cricket Team In Pakistan Tight Security Arrangement for players)

पाकिस्तान दौऱ्यात 7 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर डिसेंबरमध्ये 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड पुन्हा एकदा पाकिस्तानात येणार आहे. इंग्लंडचा क्रिकेट संघ आज पाकिस्तानातील कराचीत दाखल झाला आहे.

इंग्लंडने 2005 ला शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी इंग्लंड पाकिस्तानचा दौरा करणार होते. मात्र, न्यूझीलंडने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौऱ्या अर्ध्यावर सोडला होता. त्यानंतर इंग्लंडने देखील आयत्यावेळी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली होती.


हेही वाचा – पाकिस्तानचे पंच असद रऊफ यांचे निधन

First Published on: September 15, 2022 7:12 PM
Exit mobile version