फिफा विश्वचषक २०२२ : मोरोक्कोकडून बेल्जियमचा पराभव; ब्रसेल्समध्ये हिंसाचार, चाहत्यांनी पेटवल्या गाड्या

फिफा विश्वचषक २०२२ : मोरोक्कोकडून बेल्जियमचा पराभव; ब्रसेल्समध्ये हिंसाचार, चाहत्यांनी पेटवल्या गाड्या

यंदाचा फिफा विश्वचषक २०२२ कतारमध्ये सुरू असून आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. जगभरातील सर्व फुटबॉलप्रेमींकडून या फिफा विश्वचषकाला चांगला प्रतिसाद मिळतोय. असे असतानाच या विश्वचषकाला गालबोट लागले आहे. या विश्वचषकातील साखळी फेरीत बलाढ्य बेल्जियमला मोरक्कोकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर बेल्जियमच्या राजधानीमध्ये हिंसक घटना घडत आहेत. (FIFA World Cup 2022 Violence erupts in Belgium shops torched vehicles burnt many arrested)

मिळालेल्या माहितीनुसार, संतप्त जमावाने अनेक इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर्सना आग लावली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी डझनभर लोकांना तब्यात घेतले आहे. हे सर्वजण दंलग नियंत्रणासाठी तैनात पोलिसांशी भिडले होते. ब्रुसेल्समधील अनेक ठिकाणी दंगल भडकल्याचे दिसत होते. दंगेखोरांना शांत करताना पोलिसांची कसोटी लागत होती.

या हिंसाचाराबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास शांतता प्रस्थापित झाली. आता संवेदनशील भागात पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून गस्त सुरू आहे. सध्या पोलीस सातत्याने संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांकडूनही पोलिसांचे एक पथक सातत्याने चौकशी करत आहे. त्यामुळे दंगलीचे स्पष्ट कारण आणि कट रचणाऱ्याची माहिती घेतली जाईल.

ब्रुसेल्सचे महापौर फिलिप क्लोस यांनी लोकांना ब्रुसेल्स शहराच्या मध्यभागापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे, कारण या भागात दंगल उसळली होती. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांना खबरदारीचा उपाय म्हणून ब्रुसेल्समधील मेट्रो आणि ट्राम सेवा तात्पुरती बंद केली आहे. हिंसाचार होण्याचा धोका पाहता रस्त्यावर पोलिसांची बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.


हेही वाचा – पीटी उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड निश्चित

First Published on: November 28, 2022 12:16 PM
Exit mobile version