घरक्रीडापीटी उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड निश्चित

पीटी उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड निश्चित

Subscribe

भारताची दिग्गज धावपटू पीटी उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. या पदासाठी इतर कोणीही उमेदवारी दाखल केलेली नाही. त्यामुळे उषा यांची निवड जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते.

भारताची दिग्गज धावपटू पीटी उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. या पदासाठी इतर कोणीही उमेदवारी दाखल केलेली नाही. त्यामुळे उषा यांची निवड जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते. पीटी उषा यांनी शनिवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. (Pt Usha Set To Become New Indian Olympic Association President After Emerging As Lone Candidate)

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदाची निवडणूक 10 डिसेंबर रोजी होणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज रविवार शेवटची तारीख होती.

- Advertisement -

आयओए निवडणुकीचे रिटर्निंग ऑफिसर उमेश सिन्हा यांनी सांगितले होते की, शुक्रवार आणि शनिवारी उमेदवारी अर्ज आले नाहीत. दरम्यान, पीटी उषा यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत 400 मीटर अडथळा शर्यतीत अनेक सुवर्णपदके जिंकणाऱ्या आणि 1984 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवणाऱ्या 58 वर्षीय उषा यांनी ट्विटमध्ये ही घोषणा केली होती.


हेही वाचा – आंतर विभागीय अ‍ॅथलेटिक्समध्ये ठाण्याला सहा पदके

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -