IND vs SA : तू अपरिपक्व… विराटच्या ‘त्या’ वर्तवणूकीवर गौतम गंभीर भडकला

IND vs SA : तू अपरिपक्व… विराटच्या ‘त्या’ वर्तवणूकीवर गौतम गंभीर भडकला

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानावरील त्याच्या आक्रमक वृत्तीमुळे टीकेला घेरला जातो. परंतु त्याच्या आक्रमक वृत्तीमुळे तो पुन्हा एकदा निशाण्यावर आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कोहलीच्या वर्तनावरून माजी भारतीय संघाचा क्रिकेटपटू गौतम गंभीरने त्याला अपरिपक्व असं म्हटलंय. तसेच तुम्ही युवकांचे कधीही आदर्श बनू शकत नाहीत, असं देखील गंभीरने म्हटलं आहे.

तिसऱ्या दिवशी डीआरएसच्या निर्णयानंतर यजमान कर्णधार डीन एल्गरला जीवदान मिळाल्यानंतर कोहलीने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर विराट कोहली, आर अश्विन आणि केएल राहुल यांनी सुद्धा त्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, विराट कोहलीने हे सर्व घडल्यानंतर स्टंप माईकमध्ये खरे खोटे देखील सुनावले होते.

एका खेळाडूने असे कृत्य करू नये

कोहलीच्या या वागण्यावर फलंदाज गौतम गंभीर भडकला. हा विराटचा बालिशपणा आहे. गेल्या काही वर्षांपासून तो भारतीय संघाचे नेतृत्त्व करतोय. सामन्याचा निकाल काहीही असो परंतु एका खेळाडूने असे कृत्य करू नये, तो अनुभवी खेळाडू असल्यामुळे त्याच्या कृत्याचे समर्थन करता येणार नाही. युवा खेळाडू त्याला आदर्श मानतात, असं गौतम गंभीर म्हणाला.

तुम्ही कधीही युवकांचे आदर्श होऊ शकत नाही..

भारतीय कर्णधाराने स्टंप माईकमध्ये असे बोलणे खूप चुकीचे आहे. असे करून तुम्ही कधीही युवकांचे आदर्श होऊ शकत नाही. पहिल्या डावात यष्टीरक्षकांच्या कॅचेसचं प्रकरण ५०-५० इतकं होतं. मात्र, तेव्हा तू शांत होतास आणि मयंक अग्रवाल आवाहन करत होता. मला वाटते की, राहुल द्रविडने या प्रकरणी कोहलीशी बोललं पाहिजे, असं गंभीर म्हणाला.


हेही वाचा : Novak Djokovic Visa : ऑस्ट्रेलियाने नोव्हाक जोकोविचचा दुसऱ्यांदा व्हिसा केला रद्द


 

First Published on: January 14, 2022 5:58 PM
Exit mobile version