ICC Women’s CWC Qualifier: महिलांचा झिम्बाब्वे दौरा रद्द, वाढत्या कोरोनामुळे क्वालिफायर रद्द

ICC Women’s CWC Qualifier: महिलांचा झिम्बाब्वे दौरा रद्द, वाढत्या कोरोनामुळे क्वालिफायर रद्द

ICC Women's CWC Qualifier: महिलांचा झिम्बाब्वे दौरा रद्द, वाढत्या कोरोनामुळे क्वालिफायर रद्द

दक्षिण अफ्रिकेमध्ये कोरोनाच्या नव्या ऑमिक्रॉन व्हेरियंटने हाहाकार घातला आहे. दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या विमानांच्या फेऱ्या अनेक देशांनी रद्द केल्या आहेत. यामुळे आयसीसीने मोठा निर्णय घेतला असून महिला क्रिकेट विश्वचषक २०२१ ची पात्रता फेरी रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे आणि प्रवासावरील निर्बंधांमुळे निर्णय घेण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला विश्वचषक पात्रता फेरी खेळवण्यात येणार होती. या स्पर्धेत एकूण ९ देशांतील संघ सहभागी होणार होते. यामधील ३ संघ थेट महिला विश्वचषक २०२२ साठी पात्र ठरणार होते. या विश्वचषकाचे सामने न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात येणार आहेत.

महिला विश्वचषक पात्रता फेरी रद्द झाल्यामुळे आता बांग्लादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. तर पुढच्या वर्षीच्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया, इग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांग्लादेश हे संघ पात्र ठरले आहेत. महिला विश्वचषक पात्रता फेरी रद्द केल्यानंतर नेदरलॅंडचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला आहे. भारतीय महिला संघाचा झिम्बाब्वे दौरा डिसेंबरमध्ये होणार होता तो आता रद्द करण्यात आला आहे.

नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला कसोटी सामना झाला आहे. परंतु वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसरा आणि तिसरा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने मिळून हा निर्णय़ घेतला आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेमध्ये ऑमिक्रॉन व्हेरियंट वेगाने पसरत आहे. यामुळे अमेरिका, ब्रिटन आणि अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच वाहतूक नियमही कडक केले आहेत. भारतातही याबाबत खबरदारीचा उपाय करण्यात येत आहे.


हेही वाचा : कसोटीत तिसऱ्या दिवसाअखेर भारताकडे ६३ धावांची आघाडी, भारतीय गोलंदाजांच चांगलं पुनरागमन


 

First Published on: November 27, 2021 8:20 PM
Exit mobile version