घरक्रीडाInd vs NZ, Live 1st Test, Day 3 Score: कसोटीत तिसऱ्या दिवसाअखेर...

Ind vs NZ, Live 1st Test, Day 3 Score: कसोटीत तिसऱ्या दिवसाअखेर भारताकडे ६३ धावांची आघाडी, भारतीय गोलंदाजांच चांगलं पुनरागमन

Subscribe

भारत आणि न्यूझीलंडच्या संघात कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. भारतीय संघ पहिल्या दिवशी ३४५ धावांवर ऑलआउट झाला होता. यानंतर न्यूझीलंडने २९६ धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या दिवसाअखेर भारताने १ बाद १४ धावा केल्या यामुळे आता भारतीय संघाने ६३ धावांची आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी घेतली. श्रेयस अय्यरच्या दमदार शतकीय खेळीमुळे ३४५ धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यर, १०५, रविंद्र जडेजा ५० आणि शुभमन गिलने ५२ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडने सलामीवीर फलंदाज टॉम लैथम आणि विल यंगने सर्वोत्कृष्ट खेळी केली होती. दोघांनी १५१ धावांची खेळी केली. विल यंगने १५ चौकार लगावत ८९ धावा करुन विकेट टाकला.

- Advertisement -

न्यूझीलंड २९६ धावांच्या पुढे जाऊ शकली नाही. यानंतर भारताने पहिल्या खेळीच्या धावांच्या आधारावर ४९ धावांची आघाडी केली. टॉम लैथम आणि विल यंगने जबरदस्त सुरुवात केली. सलामीच्या जोडीने १५१ धावा काढल्या. यंग ८९ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार केन विलियम्सन काही खास खेळी करु शकला नाही.

यानंतर न्यूझीलंडचे गडी बाद झाले. अक्षर पटेलसमोर न्यूझीलंडचा धुव्वा उडाला होता. मात्र टॉम लैथमने १० चौकारांच्या मदतीने ९५ धावा केल्या आहेत. परंतु संघाला आघाडी देऊ शकला नाही. भारताकडून अक्षर पटेलने ५ तर रविचंद्रन अश्विनने ३ गडी बाद केले आणि उमेश यादव, रविंद्र जडेजाने प्रत्येकी १-१ विकेट आपल्या नावे केले आहेत.

- Advertisement -

दुसऱ्या डावात भारताला शुभमन गिलच्या बाद होण्यामुळे पहिला झटका बसला होता. यानंतर चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल यांनी नाबाद १२ धावांची खेळी केली.


हेही वाचा:   Indonesia Open : पी व्ही सिंधूचा सेमी फायनलमध्ये पराभव


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -