आयसीसी एकदिवसीय महिला गोलंदाज क्रमवारी, टॉप ५ मधून झूलन गोस्वामी आउट

आयसीसी एकदिवसीय महिला गोलंदाज क्रमवारी, टॉप ५ मधून झूलन गोस्वामी आउट

एकदिवसीय (ODI) महिला गोलंदाजांची क्रमवारीका आयसीसीने (ICC ODI Ranking) नुकतीच जाहीर केली. आयसीसीच्या क्रमवारीनुसार भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) टॉप-५ मधून बाहेर गेली आहे. (icc womens odi rankings ayabonga khaka india jhulan goswami)

दक्षिण आफ्रिकेच्या अयाबोंगा खाकाने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे झुलन गोस्वामीची पाचव्या स्थानावरून घसरण झाली आहे. क्रमवारीत घसरण झाल्याने गोस्वामीला नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.

हेही वाचा – वनडे संघ क्रमवारीत पाकिस्तान भारताच्या एक पाऊल पुढे

डब्लिनमधील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात लॉरा वोल्वार्डने ८९ धावांची आक्रमक खेळी केली त्यामुळे लॉरा वोल्वार्ड क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे. शिवाय, फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाची अॅलिसा व्हिली ७८५ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे.

हेही वाचा – ICC Test Ranking : आयसीसीची कसोटी क्रमवारी जाहीर; अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा अव्वल स्थानी

स्मृती मानधना ६६९ गुणांसह आठव्या क्रमांकावर कायम आहे. यंदाच्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्धच्या शतकाचा समावेश आहे. टॉप १० मध्ये ती भारताची एकमेव फलंदाज आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाची अॅलिसा हिली पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंडची नताली स्क्रिव्हर दुसऱ्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा – बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा

First Published on: June 21, 2022 10:57 PM
Exit mobile version