घरक्रीडाबर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा

बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा

Subscribe

इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये 29 जुलैपासून सुरू होणाऱ्य कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंह करणार आहे. तर हरमनप्रीत सिंह संघाचा उपकर्णधार असणार आहे. भारतीय संघ स्पर्धेत पूल बीमध्ये इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घाना या देशासोबत असणार आहे. यावेळी 31 जुलै रोजी भारत पहिला सामना घाना विरुद्ध होणार आहे.

स्पर्धेसाठी 18 सदस्यीय संघाचा कर्णधार मनप्रीत असणार असून त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने ऑलिम्पिक पदक मिळवले होते. टोक्यो ओलिम्पिक 2020 स्पर्धेत 40 वर्षानंतर भारतीय हॉकी संघाने पदकावर नाव कोरले होते. कांस्य पदक मिळवलेला भारत कॉमनवेल्थमध्येही अप्रतिम कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. यावेळी उपकर्णधार असणारा हरमनप्रीत सिंह एफआयएच प्रो लीगमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू असल्याने त्याच्याकडूनही संघाला अधिक अपेक्षा असणार आहेत. कॉमनवेल्थ गेम्सबद्दल बोलताना संघाचे मुख्य कोच ग्राहम रीड म्हणाले, आम्ही कॉमनवेल्थ गेम्ससाठी एक दमदार संघ घेऊन चाललो आहोत. या सर्व खेळाडूंकडे महत्त्वाच्या सामन्यात चागंल्या खेळाचा अनुभव आहे.

- Advertisement -

गोलकीपर –

- Advertisement -

पीआर श्रीजेश

कृष्ण बहादुर पाठक.

डिफेंडर –

वरुण कुमार

सुरेंद्र कुमार

हरमनप्रीत सिंह

अमित रोहिदास

जुगराज सिंह

जरमनप्रीत सिंह.

मिडफील्डर-

मनप्रीत सिंह

हार्दिक सिंह विवेक सागर प्रसाद

शमशेर सिंह

आकाशदीप सिंह

नीलकांत शर्मा

फॉरवर्ड –

मनदीप सिंह

गुरजंत सिंह

ललित कुमार उपाध्याय

अभिषेक

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -