IND vs SA: रोहित-अजिंक्यने गाजवला तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस

IND vs SA: रोहित-अजिंक्यने गाजवला तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस

पहिला दिवस गाजवला रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिके दरम्यानच्या तिसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात झाली. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलदांजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या सत्रात भारतीय बॅट्समननी निराशा केली. कगिसो रबाडाच्या पहिल्या स्पेलच्या भेदक बॉलिंगसमोर भारतीय बॅट्समन टीकू शकले नाहीत. मात्र त्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने मैदानावर चांगलाच जम बसवला. भारताने दिवसअखेर ३ विकेटच्या बदल्यात २२४ रन्स केले. यामध्ये रोहित शर्मा ११७ (१६४) तर अजिंक्य रहाणेच्या ८३ (१३५) धावांचा समावेश आहे. दोघांनीही १८५ रन्सची पार्टनरशिप केली.

विराट कोहलीने बॅटिंगचा निर्णय घेतला होता, मात्र दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनी टिच्चून बॉलिंग केली. पाचव्या ओव्हरलाच मयांक अग्रवाल बाद झाला. त्यानंतर नवव्या ओव्हरमध्ये रबाडाने चेतेश्वर पुजाराला शून्यावर बाद केले. एनरिक नोर्तजेनेही आपल्या बॉलिंगची जादू दाखवत कर्णधार विराट कोहलीला बाद केले. मात्र त्यानंतर रोहित शर्माने अजिंक्यसोबत डाव सावरला. दोघांनीही शतकी भागीदारी करत १८५ धावा ठोकल्या.

तिसऱ्या कसोटीत रोहित शर्माने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. एकाच कसोटी मालिकेत सलामीवीराने दोनपेक्षा अधिक शतके ठोकण्याचा विक्रम सुनील गावसकर यांच्या नावे होता. मात्र आता या विक्रमाची बरोबरी रोहित शर्माने केली आहे.


हे वाचा – ९५ धावांवर असताना रोहीत शर्मा पावसाला म्हणाला, ‘जा रे जा रे पावसा’!

First Published on: October 19, 2019 6:11 PM
Exit mobile version