IND vs ENG : ‘अविस्मरणीय विजय’! लॉर्ड्सवरील विजयानंतर टीम इंडियाचे क्रिकेटविश्वातून कौतुक

IND vs ENG : ‘अविस्मरणीय विजय’! लॉर्ड्सवरील विजयानंतर टीम इंडियाचे क्रिकेटविश्वातून कौतुक

मोहम्मद सिराजसह भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; भारताचा लॉर्ड्सवर विजय 

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर १५१ धावांनी मात केली. लॉर्ड्सवरील या सामन्यात भारताने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या होत्या. याचे उत्तर देताना इंग्लंडने ३९१ धावा करत पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेतली होती. भारतीय संघ दुसऱ्या डावात अडचणीत होता. परंतु, पुजारा (४५) आणि रहाणे (६१) यांनी भारताचा डाव सावरला. तर पाचव्या दिवशी मोहम्मद शमी (नाबाद ५६) आणि जसप्रीत बुमराह (नाबाद ३४) यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे भारताने दुसरा डाव ८ बाद २९८ धावांवर घोषित केला. त्यामुळे चौथ्या डावात इंग्लंडला २७२ धावांचे आव्हान मिळाले. भारतीय वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा डाव अवघ्या १२० धावांत आटोपला आणि भारताने हा सामना जिंकला. लॉर्ड्सवरील या विजयानंतर क्रिकेटविश्वातून टीम इंडियाचे कौतुक झाले.

फारच उत्कृष्ट कसोटी सामना! हा सामना पाहताना खूप मजा आली. अवघड परिस्थितीत भारतीय संघाने दाखलेली जिद्द आणि हार न मानण्याची वृत्ती कौतुकास्पद होती. खूप छान खेळलात, असे भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ट्विटमध्ये लिहिले.


हेही वाचा – तेज चौकडीचा भेदक मारा; लॉर्ड्स कसोटीत टीम इंडिया विजयी


 

First Published on: August 17, 2021 3:32 PM
Exit mobile version