पावसामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी 20 सामना रद्द

पावसामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी 20 सामना रद्द

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना रद्द करण्यात आला आहे. शुक्रवारी वेलिंग्टन येथे पहिला टी 20 सामना होणार होता. परंतु, पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. या सामन्यापूर्वी सुरू झालेल्या पावसाने थांबायचे नाव न घेतल्याने नाणेफेक होऊ शकली नाही. त्यानंतर बऱ्याच वेळानंतरही पाऊस थांबत नसल्याने अखेर सामना रद्द करण्यात आला. या जोरदार पावसामुळे वेलिंग्टन स्टेडीयमच्या बाहेरील काही परिसरात पाणी साचले होते. (India vs New Zealand First T20 Match Cancelled Due To Heavy Rainfall )

टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्यात अनेक अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याकडे कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तसेच, शिखर धवनकडे वनडेचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

टी-२० विश्वचषकातील पराभव विसरून भारतीय संघ नव्या मिशनवर आहे. युवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडू न्यूझीलंडमध्ये आहेत. या दौऱ्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिकेला आजपासून सुरूवात झाली. परंतु, पावसामुळे पहिला सामना होऊ शकला नाही.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

टी-20 सामन्याचे वेळापत्रक

वनडे मालिकेचे वेळापत्रक

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ

टी-20 : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप सिंग, अर्शदीप यादव, , हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

वनडे : शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.


हेही वाचा – ऑस्ट्रेलियाने 4 वर्षांनी मायदेशात केला इंग्लंडचा पराभव, वॉर्नर, स्मिथची अर्धशतकी खेळी

First Published on: November 18, 2022 4:32 PM
Exit mobile version