घरक्रीडाऑस्ट्रेलियाने 4 वर्षांनी मायदेशात केला इंग्लंडचा पराभव, वॉर्नर, स्मिथची अर्धशतकी खेळी

ऑस्ट्रेलियाने 4 वर्षांनी मायदेशात केला इंग्लंडचा पराभव, वॉर्नर, स्मिथची अर्धशतकी खेळी

Subscribe

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 विकेट राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने तीन एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने 4 वर्षांनी इंग्लंडचा मायदेशात पराभव केला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 विकेट राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने तीन एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने 4 वर्षांनी इंग्लंडचा मायदेशात पराभव केला आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाने अॅडलेडमध्ये शेवटचा विजय मिळवला होता. इंग्लंडचा तीन गडी राखून ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. (Australia Beat England By 6 Wickets In First ODI David Warner Travis Head And Steve Smith Hit Half Centuries)

आज झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाने 287 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवले. इंग्लंडच्या 287 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 46.5 षटकांत 4 गडी गमावत 291 धावा केल्या आणि सामना जिंकला.

- Advertisement -

या सामन्यात प्रथम फलंदाजी इंग्लंडच्या फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही. त्यांच्या सतत विकेट पडत होत्या. एकट्या डेव्हिड मलानने शतकी खेळी करत संघाला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याने 128 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकार मारत 134 धावा केल्या. मलाननंतर डेव्हिड विलीने 40 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या. तसेच, कर्णधार जोस बटलरने 34 चेंडूत नाबाद 29 धावांची खेळी केली. तसेच, सॅम बिलिंग्ज 17, ख्रिस जॉर्डन 14, फिलिप सॉल्ट 14, लियाम डॉसन 11, ल्यूक वुड 10, जेसन रॉय 6 आणि जेम्स व्हिन्स 5 धावांवर बाद झाले. ऑली स्टोन खाते न उघडता एकावर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार कमिन्स आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी तीन बळी घेतले. मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टॉइनिस यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेडने संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी केली. हेड 57 चेंडूत 69 धावा काढून बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर 84 चेंडूत 86 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दोघांनी प्रत्येकी 10-10 चौकार आणि एक षटकार मारला.

- Advertisement -

हेडला ख्रिस जॉर्डनने आणि वॉर्नरला डेव्हिड विलीने बाद केले. मार्निश लबुशेन चार आणि अॅलेक्स कॅरीने 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. स्टीव्ह स्मिथने 78 चेंडूत नाबाद 80 आणि कॅमेरून ग्रीनने 28 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने दोन बळी घेतले. जॉर्डन आणि डॉसन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.


हेही वाचा – चेन्नई सुपर किंग्जसाठी धोनीनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो कर्णधार, दिग्गजांकडून मोठी मागणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -