IPL 2021 : DC vs CSK सामन्यानंतर ऑरेंज, पर्पल कॅपमध्ये फेरबदल

IPL 2021 : DC vs CSK सामन्यानंतर ऑरेंज, पर्पल कॅपमध्ये फेरबदल

शिमरोन हेटमायरच्या सावध खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. या विजयामुळे गुणतालिकेत २० गुण मिळवत पहिले स्थान पटकावले आहे. अतिशय चुरशीच्या अशा सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने तीन फलंदाज राखत चेन्नईवर विजय मिळवला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत दिल्लीला विजयासाठी १३७ धावांचे आव्हान दिले. हे १३७ धावांचे लक्ष गाठण्यासाठी दिल्लीला शेवटच्या ३ षटकांत २८ धावांची गरज असताना गयानीसने ड्वेन ब्राव्होच्या एका षटकात १२ धावा काढल्या. त्यानंतर वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडच्या षटकात १० धावा घेताना शेवटच्या ६ चेंडूत ६ धावांची गरज असे समीकरण तयार केले. अक्षर पटेलला गमावूनही २ चेंडू बाकी असताना दिल्लीने चेन्नईवर विजय मिळवला.

या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्स ने गुणतालिकेतील आपले पहिले स्थान पटकावले आहे. हा सामना जिंकत दिल्लीने सुनिश्चित केले की आम्ही वरच्या स्थरासाठी पात्र आहोत. चेन्नई आता दुसऱ्या, तर आरसीबी तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबई आणि हैद्राबाद पहिल्यापासूनच गुणतालिकेत तळाशी आहेत.

आयपीएल २०२१ च्या ऑरेंज कॅपमधील फेरबदल

पंजाब किंग्जचा कर्णधार के.एल.राहुल ५२८ धावांसह या यादीत पहिल्या स्थानावर आहे, त्याच्यापाठोपाठ चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड ५२१ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवन ५०१ धावांसह तिसऱ्या स्थानावर असून संजू सॅमसन आणि फाफ डु प्लेसीस अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

आयपीएल २०२१ च्या पर्पल कॅपमधील फेरबदल

मुंबई विरूध्दच्या सामन्यात हॅट्रिक घेत हर्षल पटेलने चांगलीच आघाडी घेतली आहे, त्याने २६ बळी घेत पर्पल कॅपच्या अव्वल स्थानावर आपले स्थान कायम ठेवले आहे. तर त्याचा दुसरा प्रतिस्पर्धी आवेश खान दुसऱ्या स्थानावर आहे, त्या दोघांमध्ये फक्त ४ बळींचे अंतर आहे. पंजाब किंग्जचा मोहम्मद शमी तिसऱ्या स्थानावर आहे, त्यापाठोपाठ मुंबईचा जसप्रीत बुमराह १७ बळींसह चौथ्या तर शमीचा सहकारी अर्शदीप सिंग पाचव्या स्थानावर आहे.

आयपीएल २०२१ मधील दिल्ली विरूध्द चेन्नई सामन्यानंतरची गुणतालिका :

संघ                    सामने    विजयी      पराभूत        गुण

दिल्ली कॅपिटल्स       १३      १०            ३            २०
सीएसके                 १३      १०            ४            १८
आरसीबी                १२      ९             ४            १६
केकेआर                १३      ६             ७            १२


पंजाब किंग्ज            १३      ५             ८            १०
आर आर                १२      ५             ७           १०
मुंबई                    १२      ५             ७            १०
हैद्राबाद                 १२      २             १०           ४


हेही वाचा – IPL 2021 : सेहवाग २२ वर्षीय वेगवान गोलंदाजाचा झाला फॅन, म्हणाला टीम इंडियाचे भविष्य


 

First Published on: October 5, 2021 11:04 AM
Exit mobile version