‘या’ पाकिस्तानी खेळाडूचा विराट कोहलीला सपोर्ट

‘या’ पाकिस्तानी खेळाडूचा विराट कोहलीला सपोर्ट

भारतीय क्रिकेट संघाचा आणि आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याला चांगली कामगिरी करता येत नाही. सध्या विराट कोहली सध्या खराब फॉर्मपासून झूंजतोय. हैदराबाद विरूद्धच्या सामन्यातही विराट शून्यावरच माघारी परतला. विराटच्या या खराब फॉर्मवरून क्रिकेटप्रेमींमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. एकिकडे विराटच्या या कामगिरीवरून नाराजी व्यक्त केली जात आहे तर, दुसरीकडे पाकिस्तानच्या माजी खेळाडूने विराटला पाठिंबा दिला आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज दिग्गज क्रिकेटपटू शोएब अख्तर याने विराट कोहलीला पाठिंबा दिला आहे. ‘विराटला काहीही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही. सध्या त्याच्यावर दबाव असल्यामुळे तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाहीय’, असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.

“विराटला काहीही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही. सध्या त्याच्यावर दबाव असल्यामुळे तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. सध्या विराटने फक्त मैदानावर जाऊन खेळाचा आनंद घेण्याची गरज आहे. धावा बनवण्यासाठी तो खुप प्रयत्न करतोय.मी विराट कोहली आहे, आणि मी जे नेहमी करतो, ते आज मी करू शकत नाहीय, असा विचार तो करतोय. हीच वेळ असते, जेव्हा तुम्ही मनुष्य आहात, हे लक्षात घेतलं पाहिजे असे शोएब म्हणाला. माणसं अपयशी ठरतात. पण विराट सारखे लोक जे महान खेळाडू आहेत. त्यांना माहित असतं, की अपयशानंतर कमबॅक कस करायचं. सध्या सगळेच जण त्याच्या मागे लागलेत.”, शोएब अख्तर याने म्हटलं.

सनरायजर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात विराट कोहली पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. खरंतर विराट जगदीस सुचितच्या चेंडूवर आऊट झाला, तो बाद होण्यासारखा नव्हता, पण विराट बाद झाला. त्याने विलियमसनकडे सोपा झेल दिला. विराटने यंदाच्या पर्वात कामगिरी पाहता गेल्या 12 सामन्यात त्याने 216 धावा केल्या आहेत. त्याने 12 डावात फक्त एक अर्धशतक झळकावले. मागच्या दोन वर्षात विराट कोहलीच्या बॅटमधून शतकही निघाले नाही. विराट कोहलीवर टीकेची फटकेबाजी सूरू आहे.


हेही वाचा – Delhi Capitals Covid : दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंबाबत कोरोनाचा अहवाल जाहीर, सामना होणार की नाही?

First Published on: May 9, 2022 9:57 AM
Exit mobile version