मारिया शारापोव्हा विम्बल्डनमधून आऊट

मारिया शारापोव्हा विम्बल्डनमधून आऊट

मारिया शारापोव्हा

महिला टेनिसमधील एक महत्वाची खेळाडू मारिया शारापोव्हा आपल्या विम्बल्डनच्या पहिल्याच सामन्यात रशियाच्या विटालिया कडून पराभूत झाली आहे. विशेष म्हणजे मागील आठ वर्षात पहिल्यांदाच मारिया आपल्या सलामीच्या सामन्यात पराभूत झाली आहे. मारियाच्या या पराभवामुळे तिला या स्पर्धेबाहेर जावे लागले असल्याने मारियाच्या चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. मारिया सोबतच २०११ आणि २०१४ सालची विजेती, पेत्रा क्वितोवा ही अलेक्झांड्रा सासोनोव्हिककडून पराभूत होऊन पहिल्या फेरीतूनच स्पर्धेबाहेर गेली आहे. तर दुसरीकडे पुरूष गटात स्पेनचा टेनिसपटू आणि माजी विजेता राफेल नदालने विजय मिळवला आहे. नदालने डुडी सेलावर ६-३, ६-३, ६-२ अशा फरकाने दणदणीत विजय मिळवत स्पर्धेत आपले खाते खोलले आहे.

राफेल नदाल

मारियाचा पराभव केलेली विटालिया ही जागतिक क्रमवारीत १३२ व्या क्रमांकावर आहे. विटालिया विरूद्ध शारापोव्हा या सामन्यात मारिया सामन्याच्या सुरूवातीला ५-२ च्या फरकाने पुढे होती. मात्र सामन्याच्या उत्तरार्धात विटालियाने उत्कृष्ट खेळ दाखवत ६-७, ७-६ आणि ६-४ च्या फरकाने विजय मिळवला. विशेष म्हणजे पाठीचे दुखणे असताना देखील विटालियाने अप्रतिम खेळ दाखवत विजयावर आपले नाव कोरले. याचसोबत महिलांच्या स्पर्धेत गर्बिनने नाओमी ब्रॅडीला ६-२ आणि ७-५ च्या तर समंथा स्टोसूरने शुई पेंगवर ६-४, ७-५ च्या फरकाने विजय मिळवला. यानंतर सुवेई हिसेहने पावलीचेन्कोला ६-४, ४-६, ६-३ तर ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅशलीघ बार्टीने ७-५, ६-३ च्या फरकाने व्होगोलीला मात देत सामन्यात विजय नोंदविला. शेवटी झालेल्या सामन्यात अँजेलिक कर्बरने व्हेरा जोवोनारेवाला ७-५, ६-३ च्या फरकाने पराभूत करत विजय मिळवला.

वाचा- विम्बल्डन टेनिस स्पर्धा : राफेल नदालची विजयी सलामी

 

First Published on: July 4, 2018 6:34 PM
Exit mobile version