घरक्रीडाविम्बल्डन टेनिस स्पर्धा : राफेल नदालची विजयी सलामी

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : राफेल नदालची विजयी सलामी

Subscribe

नदालसोबतच जुआन मार्टिन डेलपोत्रो आणि महिलांमध्ये गर्बिन मुगुरुझा यांनी आपले पहिले सामने जिंकत विजयी सलामी दिली आहे

टेनिस विश्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी विम्बल्डन टेनिस स्पर्धा लंडनमध्ये सुरू आहे. स्पर्धेच्या सुरूवातीच्याच सामन्यात स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने विजय मिळवला आहे. राफेल नदाल हा टेनिसजगतातील एक अप्रतिम खेळाडू मानला जातो त्याने फ्रेंच ओपन स्पर्धा अकरा वेळा जिंकली आहे. तर अमेरिकन ओपन स्पर्धेत तीन वेळा, विम्बल्डनमध्ये दोन वेळा व ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत एकदा जेतेपद पटकावले आहे. ऑलिम्पिकमध्येही नदालने एकदा सुवर्णपदक जिंकले आहे. विम्बल्डन २०१८ च्या आपल्या पहिल्याच सामन्यात नदालने इस्त्रायलच्या डुडी सेलाला धुळ चारत विजय मिळवला. नदालसोबतच जुआन मार्टिन डेलपोत्रो आणि महिलांमध्ये गर्बिन मुगुरुझा यांनी आपले पहिले सामने जिंकत विजयी सलामी दिली आहे.

‘मेन सिंगल्स’

राफेल नदाल आणि डुडी सेला यांच्यात झालेल्या सामन्यात नदालने डुडी सेलावर ६-३, ६-३, ६-२ अशा फरकाने दणदणीत विजय मिळवला. तर दुसरीकडे जुआन मार्टिन डेलपोत्रोने अप्रतिम खेळ करत पीटर गोझोविकला ६-३, ६-४, ६-३ च्या फरकाने हरविले. ख्रिस्तियन हॅरीसन आणि केई निशिकोरी यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात ६-२, ४-६, ७-४, ६-२ च्या फरकाने विजय मिळवला. अखेरच्या सामन्यात फेड्रिको डेल्वोनिसचा फेलिसिया लोपेझने ६-३, ६-४, ६-२ च्या फरकाने पराभव केला.

- Advertisement -

‘वूमन सिंगल्स’

महिलांच्या सामन्यात गर्बिनने नाओमी ब्रॅडीला ६-२ आणि ७-५ च्या फरकाने हरवत विजयाचे खाते खोलले. त्यानंतर समंथा स्टोसूरने शुई पेंगवर ६-४, ७-५ च्या फरकाने विजय मिळवला. सुवेई हिसेहने पावलीचेन्कोला ६-४, ४-६, ६-३ असा पराभवाचा धक्का दिला. तर ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅशलीघ बार्टीने ७-५, ६-३ च्या फरकाने व्होगोलीला मात देत विजय मिळवला. अखेरच्या सामन्यात अँजेलिक कर्बरने व्हेरा जोवोनारेवाला ७-५, ६-३ च्या फरकाने पराभूत करत विजय मिळवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -