Ranji Trophy 2022: रणजी करंडक स्पर्धेमध्ये अजिंक्य रहाणे आणि पुजारा येणार आमनेसामने, अर्जुन तेंडुलकरची मुंबईसाठी निवड

Ranji Trophy 2022:  रणजी करंडक स्पर्धेमध्ये अजिंक्य रहाणे आणि पुजारा येणार आमनेसामने, अर्जुन तेंडुलकरची मुंबईसाठी निवड

भारतीय क्रिकेट बोर्डने (बीसीसीआय) कोविड-१९ च्या महामारीत सुरक्षित जागेवर रणजी ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं. रणजी करंडक स्पर्धेला १७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या सामन्यात ३८ संघ असून सामना सुरू होण्यापूर्वीच पाच दिवसांसाठी सर्व खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. टीमची सदस्य संख्या ३० असणार आहे. यामध्ये स्टाफचा सुद्धा समावेश असणार आहे.

रणजी करंडक ट्रॉफीचं आयोजन अवघ्या दोन वर्षानंतर दोन टप्प्यांत केलं जाणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. या स्पर्धेनंतर आयपीएलच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. बोर्डाने आज मंगळवारी टुर्नामेंटची देखील घोषणा केली आहे. प्रत्येक टीममध्ये जास्तीत जास्त ३० सदस्य असणार आहेत. तर जवळपास २० खेळाडू असणार आहेत. त्याचप्रमाणे स्टाफची संख्या १० असू शकते.

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा आमनेसामने येणार

गतविजेते सौराष्ट्र आणि मुंबई यांच्यात अहमदाबादमध्ये होणाऱ्या पहिल्या फेरीच्या सामन्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण या सामन्यात भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा आमनेसामने येणार आहेत. पुजाराचा सौराष्ट्र संघात समावेश करण्यात आला असून रहाणेचा मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे. खराब फॉर्मशी झुंज देत असलेल्या या दोन्ही फलंदाजांची नजर मोठ्या खेळींवर असते. परंतु सध्या या दोन्ही खेळाडूंची नजर रणजी ट्रॉफीवर असणार आहे.

११ मार्चपासून प्री-क्वार्टर फायनल पहिल्या टप्प्यात खेळवली जाणार आहे. हा सामना पाच दिवसांचा असणार आहे. शेवटच्या १६ व्या सामन्यात सहभागी होणाऱ्या संघाला चार दिवसांच्या आयसोलेशनमधून जावे लागणार आहे. तसेच रणजी ट्रॉफीचा दुसरा टप्पा ३० मे रोजी खेळवला जाणार आहे.

अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या संघात निवड

पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली अजिंक्यला रणजी करंडक स्पर्धेत खेळावे लागणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचीही मुंबईच्या संघात निवड करण्यात आली आहे.


हेही वाचा : BMC : पाण्याचे खासगी मिटर ५ वर्षात बदलावे लागणार, मुंबई पालिकेकडून लागू नियमांत बदल


 

First Published on: February 8, 2022 9:47 PM
Exit mobile version