घरताज्या घडामोडीBMC : पाण्याचे खासगी मिटर ५ वर्षात बदलावे लागणार, मुंबई पालिकेकडून लागू...

BMC : पाण्याचे खासगी मिटर ५ वर्षात बदलावे लागणार, मुंबई पालिकेकडून लागू नियमांत बदल

Subscribe

मुंबई महापालिकेने नगरसेवकांच्या मागणीवरून पालिकेने पिण्याच्या पाण्याच्या मिटरबाबत लागू नियमांत काही बदल केले आहेत. त्यानुसार आता पालिकेने पुरवठा केलेले पाण्याचे मिटर जर १० वर्षात चोरीला गेल्यास अथवा नादुरुस्त झाल्यास संबंधित ग्राहकांना मिटरची संपूर्ण रक्कम भरावी लागणार नाही. दरवर्षी मिटरच्या किमतीत १० टक्के रक्कम कमी कमी होत जाऊन त्या प्रमाणे ग्राहकांना मिटरची किंमत भरावी लागणार आहे. मात्र मिटरचे भंगार मूल्य किमान २८० ते ६४३ इतके भरावे लागणार आहे.

तसेच, खासगी सोसायटीमधील पाण्याचे मिटर असल्यास त्यांना सदर मिटरची ५ वर्षाची मुदत संपल्यावर ते मिटर बदलणे बंधनकारक असणार आहे. मात्र जर तो पाण्याचा मिटर सुस्थितीत असेल तर दरवर्षी तो मिटर वापरण्यासाठी पालिकेचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असणार आहे.त्यामुळे पालिकेने जरी पाण्याच्या चोरी होणाऱ्या अथवा बिघाड झालेल्या मिटरबाबत ग्राहकांना ‘हातभर’ दिलासा दिल्याचे दर्शवले असले तरी नवीन नियमानुसार आता पाण्याचा मिटर चोरीला गेला अथवा नादुरुस्त झाल्यास संबंधित ग्राहकाला १० वर्षात दिलेल्या टप्प्यानुसार किमान २८० ते ६४३ रुपये एवढे भंगार मूल्य भरावेच लागणार असल्याने ‘ वीतभर’ भुदंड बसणार आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेने २००९ ते २०१६ या कालावधीत शहर, पश्चिम व पूर्व उपनगर या ठिकाणी तीन वेगवेगळ्या कंत्राटदारांमार्फत ९५ हजार पाण्याचे स्वयंचलित मिटर बसवले आहेत. या मिटरमध्ये काही बिघाड झाल्यास पालिकेकडून त्याची दुरुस्ती केल्यास त्याचे शुल्क संबंधितांना भरावे लागते. या मिटरच्या संपूर्ण सुरक्षिततेची जबाबदारीही त्या ग्राहकांची असते. त्यामुळे यापूर्वी जर पाण्याचे मिटर १ ते १० वर्षात केव्हाही चोरीला गेल्यास अथवा ते निकामी झाल्यास, नादुरुस्त झाल्यास संबंधितांना त्या मिटरची संपूर्ण रक्कम भरावी लागत असे.

त्यामुळे त्या ग्राहकांना त्या जुन्या मिटरची संपूर्ण किंमत भरावी लागत असे. त्याचा मोठा भुदंड त्या ग्राहकांना बसत असे. त्यामुळे ग्राहक व पालिका अधिकारी यांच्यात सदर मिटरची किंमत वसूल करण्यावरून वादविवाद होत असत.त्यामुळे काही नगरसेवकांनी याप्रकरणी पालिकेने गांभीर्याने लक्ष घालून समाधानकारक तोडगा काढण्याची विनंती केली होती.
त्यावरून पालिकेने त्यांनी पुरवठा केलेले पाण्याचे मिटर जर एक ते दहा वर्षात चोरीला गेल्यास अथवा नादुरुस्त झाल्यास संबंधित ग्राहकाने त्या मिटरची रक्कम व त्या मिटरची भंगार किंमत अशी रक्कम भरण्याबाबत नवीन नियम तयार केले असून त्या बाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजूरीसाठी आणला आहे.

- Advertisement -

यामध्ये, जर पालिकेचा मिटर चोरीला गेल्यास अथवा नादुरुस्त झाल्यास संबंधित ग्राहकाने तो मिटर जर पहिल्या वर्षी चोरीला गेल्यास मिटरची संपूर्ण रक्कम व त्या मिटरचे भंगार मूल्य अंदाजे किमान २८० ते ६४३ रुपये इतके भरावे लागणार आहे. जर मिटर दुसऱ्या वर्षात चोरीला गेल्यास मिटरच्या एकूण किमतीच्या १०% कमी रक्कम व भंगार मूल्य भरावे लागणार आहे. जर मिटर पाचव्या वर्षात चोरीला गेल्यास सदर मिटरच्या एकूण किमतीच्या ४०% रक्कम आणि मिटरचे भंगार मूल्य भरावे लागणार आहे. जर मिटरची १० वर्षाची मुदत संपल्यावर तो मिटर चोरीला गेल्यास संबंधित ग्राहकाला मिटरची संपूर्ण किंमत न भरता फक्त मिटरचे भंगार मूल्यच भरावे लागणार आहे.

सदर पाण्याच्या स्वयंचलित मिटरची किंमत कंपनी ठरवते. मात्र सर्वसाधारणपणे १५ मिमी च्या मिटरची किंमत ११,२५० रुपये, २० मिमी मिटरची किंमत १३,३०० रुपये, २५ मिमी मिटरची किंमत २३,४८३ रुपये, ४० मिमी मिटरची किंमत ३४,७७१ रुपये, ५० मिमी मिटरची किंमत ५४,५३३ रुपये, ८० मिमी मिटरची किंमत ६९,८९५ रुपये, १०० मिमी मिटरची किंमत ९२,१८२ रुपये किंमत आहे. तसेच, नादुरुस्त व चोरीला मिटर गेल्यानंतर जर संबंधितांनी नवीन मिटर बसवून ते कार्यान्वित न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे. खासगी मिटर धारकांनी मिटर नादुरुस्त झाल्यास एका महिन्यात ते मिटर कार्यान्वित करायचे आहेत.


हेही वाचा : Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचा उद्रेक, मागील २४ तासांत ४४७ नव्या रूग्णांची नोंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -