PAK vs BAN Test series : पाकिस्तानविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी बांगलादेशला झटका; हा स्टार खेळाडू संघाबाहेर

PAK vs BAN Test series : पाकिस्तानविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी बांगलादेशला झटका; हा स्टार खेळाडू संघाबाहेर

पाकिस्तान आणि बागंलादेशमध्ये शुक्रवारी सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी बांगलादेशच्या संघाला मोठा झटका बसला आहे. शुक्रवारी चटगावमध्ये सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येलाच बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन संघातून बाहेर गेला आहे. शाकिबला टी-२० विश्वचषकाच्या दरम्यान दुखापत झाली होती. बांगलादेशच्या संघ निवड समितीचे मुख्य अधिकारी मिन्हाजुल आबेदिन यांच्या माहितीनुसार शाकिबला ठिक होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. साहजिकच त्यांच्या म्हणण्यानुसार शाकिब अल हसन पाकिस्तानविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात संघाचा हिस्सा नसणार आहे.

आबेदिन यांनी सांगितले की, “शाकिब विश्वचषकादरम्यान झालेल्या दुखापतीतून अद्याप ठिक झाला नाही. त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. आमच्याकडून तो लवकरात लवकर ठिक व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तो पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाचा हिस्सा नसेल. आम्हाला याबाबत देखील कल्पना नाही की तो दुसरा सामना खेळू शकेल की नाही. डॉक्टरांकडून वेळोवेळी आम्ही माहिती घेत आहोत. आम्ही जेव्हा १६ सदस्यीस संघाची घोषणा केली तेव्हापासून आम्ही त्याच्या तब्येतीची विचारपूस केल्याशिवाय त्याच्या जागेवर संघात कोणालाच स्थान दिले नाही”.

दरम्यान शाकिबने टी-२० विश्वचषकातील बांगलादेशचे दोन शेवटचे सामने देखील खेळले नव्हते. सोबतच पाकिस्तानविरूध्द झालेल्या टी-२० मालिकेत देखील तो संघाचा हिस्सा नव्हता. एक वर्षाच्या पुनरागमनानंतर शाकिबने विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा फक्त १ कसोटी सामना फेब्रुवारीमध्ये वेस्टइंडीजविरूध्द खेळला होता. लक्षणीय बाब म्हणजे त्या सामन्यात देखील त्याला दुखापत झाली होती.

बांगलादेशच्या पहिल्या कसोटी सामन्यात संघाचा महत्त्वाचा खेळाडू तमीम इकबाल देखील संघात नसणार आहे. कारण त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. तर तस्कीन अहमद आणि शरीफुल इस्लाम हे देखील दुखापतीमुळे चटगावमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात संघातून बाहेर असणार आहे.


हे ही वाचा: IND vs NZ Test series : श्रेयस अय्यर २०२१ मध्ये डेब्यू करणारा ठरला ५ वा भारतीय; गावस्करांनी सोपवली जबाबदारी


 

First Published on: November 25, 2021 3:14 PM
Exit mobile version