दीप दासगुप्ता म्हणतो, पंत मॅचविनर खेळाडू!

दीप दासगुप्ता म्हणतो, पंत मॅचविनर खेळाडू!

इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. त्यानंतर भारताचा यष्टीरक्षक आणि माजी कर्णधार धोनीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली. त्यानंतर एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने यष्टीरक्षणाची जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवली. मात्र ऋषभ पंतला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. यष्टीमागची ढिसाळ कामगिरी आणि फलंदाजीतील हरवलेला सुरु यामुळे भारताने कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वृद्धीमान साहाला संधी दिली. दरम्यान, सोशल मीडियावर पंतला विश्रांती देऊन धोनीला पुन्हा संघात घ्या अशी मागणी चाहते करत होते. मात्र भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्ता यांना ऋषभ पंतमध्ये सामना जिंकवून देणारा खएळाडू दिसला. त्यामुळे त्याला संधी मिळणं गरजेचं आहे, दीप दासगुप्ताला वाटतं.


हेही वाचा – चिंताजनक! भारतात आढळले ‘फॉल्स निगेटिव्ह’ कोरोना रुग्ण

“ऋषभ पंतवर विश्वास ठेवत त्याला संधी देण्यात आली. संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय योग्य होता. पंत गुणी खेळाडू तसंच तो मॅचविनर खेळाडू आहे. त्याच्या खेळात आत्मविश्वास आहे. मात्र त्याला योग्य संधी मिळाली पाहिजे. त्याला संघात योग्य पद्धतीने हाताळलं गेलं पाहिजे. न्यूझीलंड दौऱ्यात त्याची संघात निवड झाली होती. मात्र, तो महिनाभर राखीव खेळाडूंच्या बाकावर बसून होता. जे खेळाडू सामन्यात खेळणार असतात त्यांना नेट्समध्ये सरावाची संधी मिळते. अशा परिस्थितीत पंतला नेट्समध्येही फलंदाजीचा फारसा सराव करता आला नसेल.

यावेळी दीप दासगुप्ताने ऋषभ पंतला काही मोलाचा सल्लाही दिला. जर संघात संधी मिळणार नसेल तर ऋषभने स्थानिक क्रिकेट खेळत आपलं तंत्र अधिक सुधारायला हवं. मयांक अग्रवाल, लोकेश राहुल यासारख्या खेळाडूंनी स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत आपलं तंत्र सुधारलं, ज्याचा फायदा त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही झाला.

 

First Published on: April 9, 2020 4:40 PM
Exit mobile version