Road Safety World Series: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमधून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची माघार, जाणून घ्या कारण

Road Safety World Series: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमधून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची माघार, जाणून घ्या कारण

यंदाच्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमधून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने माघार घेतली आहे. या सीरिजमध्ये न खेळण्याचा निर्णय सचिनने घेतला आहे. सचिनच्या या निर्णयानंतर जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंनी ही सीरिज न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेटर इरफान पठाण, युवराज सिंह आणि मोहम्मद कैफ यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी या सीरिजबाबत तक्रार केलीय की, पहिल्या पर्वात सहभागी झालेल्या खेळाडूंना अद्यापही मानधन मिळालेलं नाहीये. सचिन तेंडुलकर हा इंडियन लिजंड्स संघाचा एक सदस्य आहे. तसेच त्याने पहिल्या पर्वात विजेतेपद पटकावले आहे.

सचिनचा सीरिज न खेळण्याचा निर्णय

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात सचिनला पूर्णपणे मानधन मिळालेलं नाहीये. त्यामुळे यंदाच्या पर्वात त्याने माघार घेतली असून सीरिज न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या पर्वातील मानधनाच्या थकबाकीमुळे अनेक दिग्गजांनी खेळण्यास नकार दिला आहे. परंतु दुसरीकडे पाहिलं असता कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सचिन तेंडुलकरने सीरिजमधून माघार घेतली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

माजी खेळाडूंना मिळालेलं नाहीये मानधन 

बांगलादेश मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, खालेद महमुद, खालेद मसूद, मेहराब होसैन, राजीन सालेह, हन्नन सरकार आणि नफीस इक्बाल यांसारख्या अनेक माजी खेळाडूंना मानधन मिळालेलं नाहीये. १ ते १९ मार्च या कालावधीत ही सीरिज यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत सचिन तेंडुलकर सदिच्छादूत होता आणि सुनील गावस्कर स्पर्धेचे आयुक्त होते. तसेच रवी गायकवाड हे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक होते.

अनेक दिग्गज खेळाडूंनी मॅजेस्टिक लीजेंड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि पीएमजी नावाच्या कंपनीशी करार केला होता. संघांचे व्यवस्थापन सेकंड इनिंग्ज स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट नावाची कंपनी करते. रवी गायकवाड यांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत सर्वांना पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु काही काळानंतर त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाहीये, असं सांगितलं जातंय. त्यामुळे सचिन तेंडुलकरने हा मोठा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा : Viral Video: कडाक्याच्या थंडीत एकाच वेळी खाल्ले ५० ऑम्लेट , व्हिडिओ पाहून लोक हैराण


 

First Published on: January 21, 2022 11:47 AM
Exit mobile version