घरट्रेंडिंगViral Video: कडाक्याच्या थंडीत एकाच वेळी खाल्ले ५० ऑम्लेट , व्हिडिओ पाहून...

Viral Video: कडाक्याच्या थंडीत एकाच वेळी खाल्ले ५० ऑम्लेट , व्हिडिओ पाहून लोक हैराण

Subscribe

जगभरात फूड लव्हर्सची कमी नाहीये. तसेच खाद्य पदार्थांमध्ये अनेक प्रकार असल्यामुळे लोकांच्या आवडी-निवडी वाढल्या आहेत. एक उदाहरण म्हणून आपण पाणीपुरी घेऊ. पाणीपुरी खाण्यासाठी कित्येक लोकं पसंती दर्शवतात. तसेच जास्तीत जास्त पाणीपुरी खाण्यासाठी शर्यत देखील लावली जाते. दुसरीकडं पाहीलं असता अधिकतर लोकं जास्त प्रमाणात जेवण करतात. मात्र, सध्या एका व्यक्तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ऑम्लेट खाताना दिसत आहे. सध्या कडाक्याची थंडी सुरू असून त्याला जास्त भूक लागलेली दिसतेय असं वाटतंय. परंतु या व्यक्तीने बघता बघता एकाच वेळी ५० ऑम्लेट खाल्ले आहेत. या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकं हैराण झाली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Porchezhiyan (@porchezhiyan_sr)

- Advertisement -

या व्यक्तीने एकूण ५० ऑम्लेट खाल्ले असून व्हिडिओला ६.१ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच १ लाखांहून अधिक लाईक्स आणि ४९५ कॉमेंट मिळाले आहेत. ही व्यक्ती केळीच्या पानावर ठेवलेले ऑम्लेट खात आहे. तो स्वत:ला एक कॉम्पेटीटर समजत आहे. या व्हिडिओमुळे लोकं हैराण झाली असून हा व्यक्ती इतकं कसं काय खावू शकतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर काही नेटकऱ्यांनी कॉमेंट देखील केल्या आहेत. मात्र, हा व्हिडिओ नक्की कोणत्या देशातील आहे हे अद्यापही समजलेलं नाहीये. परंतु केळीच्या पानावरून हा व्हिडिओ दक्षिण भारतातला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

एका नेटकऱ्याने लिहिलयं की, केळ्याचं पान उरलंय सर, कृपया ते सुद्धा खाऊन घ्या, अशी कॉमेंट केली आहे. तर दुसऱ्याने लिहिलंय की, कृपया करून देशातील गरीब लोकांना द्या, अशा प्रकारच्या विविध प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Porchezhiyan (@porchezhiyan_sr)


हेही वाचा : IPL 2022 : आयपीएलसाठी मेगा ऑक्शनच्या तयारीला सुरूवात, BCCI आंतरराष्ट्रीय मालिकेत बदल करण्याची शक्यता


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -