ENG VS IND TEST 4TH : टीम इंडियाने घडविला इतिहास, ५० वर्षांनी ओव्हलवर विजयी

ENG VS IND TEST 4TH : टीम इंडियाने घडविला इतिहास, ५० वर्षांनी ओव्हलवर विजयी

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताची २-१ अशी आघाडी

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा चौथा सामना लंडनच्या ओवल मैदानात खेळवला गेला. दोन्ही संघ पाच कसोटी मालिकांच्या सामन्यात १-१ अशा बरोबरीत असताना. भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या सामन्याचा निकाल तीन्ही बाजुने लागण्याची शक्यता होती. सामना अनिर्नित राहू शकत होता अथवा इंग्लंड किंवा भारताच्या पारड्यात पडण्याची शक्यता होती. कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने एकही गडी न गमावता ७७ धावा केल्या होत्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला २९१ धावांची गरज असताना. इंग्लंडच्या सलामीवीरांनी रॉरी बर्नस् ५० धावा, हासीब हामीद ६३ धावा अशी शतकीय भागिदारी रचत दमदार सुरुवात करून भारताला चोख प्रत्युत्तर दिले.

भारताने नवा इतिहास घडविला, जे गेल्या ५० वर्षात भारतीय संघाला करता आले नाही म्हणजेच इंग्लंडच्या ओवल मैदानात भारताला विजयाचा झेंडा रोवता आला नाही तो पराक्रम टीम इंडियाने केला. भारत (१९३६-२०१८) सालापासून १३ कसोटी सामने ओवल मैदानावर खेळला असून त्यात पाच सामन्यात पराभव तर सात सामने अनिर्नित ठरले आणि एका सामन्यात विजय मिळाला आहे. भारतीय संघाला १९७१ साली एकमात्र विजय या ओवल मैदानावर मिळवता आला. त्यानंतर ५० वर्षांनी हा सामना विजयी होऊन भारताने इतिहास घडविला आहे.

कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १९१ धावा केल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात तब्बल २९० धावा ठोकल्या. त्यानंतर इंग्लंडच्या ९९ धावांच्या आघाडीचा पाठलाग करत भारताने दुसऱ्या डावात ४६६ धावांचा डोंगर रचत इंग्लंड संघाला ३६८ धावांच लक्ष दिलं. दुसऱ्या डावात भारताच्या रोहीत शर्माने शतकीय खेळी साकारली त्याने २५६ चेंडूत १२७ धावा केल्या. तर पुजारा, रिषभ पंत आणि शार्दुल ठाकुर यांनी अर्धशतक झळकावली. चौथ्या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदानी महत्वाची भुमिका पार पाडली इंग्लंडच्या सलामीवीरांनी रॉरी बर्नस्, हासीब हामीद यांनी शतकीय भागिदारी रचत दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर १०० धावांवर इंग्लंडचा पहिला गडी बाद झाल्यावर भारतीय गोलंदाजांनी एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर जास्तवेळ टिकुन दिले नाही. गोलंदाजांनी इंग्लंडचा संघ अवघ्या २१० धावांवर गारद करत, इंग्लंडवर १५७ धावांनी विजय मिळवला.

भारतीय खेळाडूंची कामगिरी- रोहित शर्मा – १२७ धावा, पुजारा – ६१ धावा, रिषभ पंत – ५० धावा, शार्दुल ठाकुर – ६० धावा, उमेश यादव- ३ बाद, बुमराह – २ बाद, जडेजा – २ बाद, शार्दुल ठाकुर – २ बाद,
भारताने कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात विजय मिळवत २-१ अशी आघाडी घेत मालिकेवर पकड बनविली आहे.


हेही वाचा : ENG VS IND 4th Test : टीम इंडिया विजयापासुन २ विकेटस् दूर

ICC T20 WORLD CUP : पाकिस्तान संघाला मोठा धक्का, मिस्बाह आणि वकार युनूस यांचा राजीनामा

First Published on: September 6, 2021 9:29 PM
Exit mobile version