चेन्नईची वैशाली झाली चेस ग्रँडमास्टर

चेन्नईची वैशाली झाली चेस ग्रँडमास्टर

वैशाली आर

लॅटीव्हीया येथील रिगा टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये सोमवारी पार पडलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताची महिला बुद्धिबळपटू वैशाली आर. ने ग्रँडमास्टर हा खिताब पटकावला आहे. विशेष म्हणजे याआधी तिचा भाऊ आर. प्रज्ञानंदनेही ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आहे. त्यामुळे वैशीली ही तिच्या घरातील दुसरी ग्रँडमास्टर झाली आहे.

वाचा – जगातला दुसरा सर्वात छोटा ग्रँड मास्टर आर. प्रज्ञानंद!

सोमवारी लॅटीव्हीया येथील रिगा टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये पार पडलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा आणि अंतिम निकष पूर्ण केला. वैशालीने अंतिम रशियाच्या इल्या डूझाकोव्हशी बरोबरी साधत आपली एफआयडीइ रँकिगमध्ये आपले गुण २३२४ करत ग्रँडमास्टर होण्याचा खिताब पटकावला. याआधी २०१६ मध्ये वैशालीने भारताकडून आंतरराष्ट्रीय महिला मास्टर हा किताब पटकावला होता.

वैशालीचा भाऊ आर. प्रज्ञानंद जगातला दुसरा सर्वात छोटा ग्रँड मास्टर

भारताचा आर. प्रज्ञानंद ऑगस्टमध्ये इटलीत पार पडलेल्या ग्रेडीन ओपन स्पर्धेतील अप्रतिम कामगिरीमुळे जगातला दुसरा तर भारताचा सर्वात कमी वयाचा पहिला ग्रँड मास्टर म्हणून घोषित केला गेला होता. त्याचे सध्या एफआयडीइ रँकिगमधील गुण २५३२ आहेत. आर. प्रज्ञानंद पाठोपाठ आता त्याच्या बहिणीने ही ग्रँडमास्टर पदाचा खिताब पटकावल्यामुळे सर्व भारतातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आर प्रज्ञानंदन
First Published on: August 14, 2018 10:59 AM
Exit mobile version