Virat Kohli Special: कोहली १०० व्या कसोटीत शतकांचा दुष्काळ संपवणार? श्रीलंकेविरुद्धचा रेकॉर्ड नेमका कसा?

Virat Kohli Special: कोहली १०० व्या कसोटीत शतकांचा दुष्काळ संपवणार? श्रीलंकेविरुद्धचा रेकॉर्ड नेमका कसा?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका संपली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेचा ३-० असा क्लीन स्वीप केला आहे. आता दोन्ही संघ ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत आमनेसामने येणार आहेत. पहिला कसोटी सामना मोहालीत खेळवला जाणार आहे. विराट कोहलीच्या कारकिर्दीतील ही १००वी कसोटी असणार आहे.

२०१४ नंतर पहिल्यांदाच विराट कसोटीत कर्णधार नाही

२०१४ सालानंतर ही पहिलीच वेळ असेल की, विराट कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाही. डिसेंबर २०१४ मध्ये कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोनीनंतर तो कसोटी कर्णधार झाला. आता विराट रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. यंदाच्या वर्षातच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका २-१ ने गमावल्यानंतर विराटने कर्णधारपद सोडले.

श्रीलंकेविरुद्ध तो फॉर्ममध्ये परत येऊ शकेल का?

विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर क्रिकेटच्या फॉर्ममध्ये पुन्हा येऊ शकेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नोव्हेंबर २०१९ नंतर त्याने कसोटीसह कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावलेले नाही. विराटने शेवटचे शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध झळकावले होते. त्यानंतर कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर त्याने १३६ धावांची खेळी केली होती.

विराटचा श्रीलंकेविरुद्ध शानदार रेकॉर्ड

१५ कसोटी सामन्यांच्या २७ डावांमध्ये २८.१४ च्या सरासरीने ७६० धावा केल्या आहेत. यामध्ये सहा अर्धशतकांचा समावेश आहे, परंतु शतकांचा नाही. डिसेंबर २०१९ पासून तो चार वेळा शून्यावर बाद झाला. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत विराटचा उत्कृष्ट रेकॉर्ड आहे, ही दिलासादायक बाब आहे. त्याने या संघाविरुद्ध नऊ सामन्यांच्या १५ डावांत ७७.२३ च्या सरासरीने १ हजार ४ धावा केल्या आहेत. यामध्ये पाच शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

विराटचा देशांतर्ग उत्कृष्ट विक्रमही विराटचा

विराट कोहली भारतात श्रीलंका संघाविरुद्ध तीन कसोटी सामने खेळला आहे. त्याने आपल्या पाच डावात १५२.५० च्या सरासरीने ६१० धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

श्रीलंकेविरुद्ध विराटची सरासरी सर्वोत्कृष्ट विराट

कोहलीची श्रीलंकेविरुद्ध तीनपेक्षा जास्त कसोटी खेळलेल्या भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक सरासरी आहे. त्याने ७७.२३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यानंतर माजी क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ७७.२० च्या सरासरीने धावा केल्या. यानंतर चेतेश्वर पुजाराचा नंबर येतो. पुजाराने ७४.३० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना त्यांच्या खराब फॉर्ममुळे कसोटी संघातून वगळण्यात आले आहे.

श्रीलंकेविरुद्ध सचिनच्या सर्वाधिक धावा

विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर आहे तो सचिन तेंडुलकर ज्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या २५ कसोटीत ६०.४५ च्या सरासरीने १९९५ धावा केल्या. त्याचबरोबर टीम इंडियाचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या २० कसोटीत ४८.६४ च्या सरासरीने १५०८ धावा केल्या आहेत.


हेही वाचा : एकनाथ शिंदेंनी वाचून दाखवल्या शासन दरबारी मान्य लेखी मागण्या, संभाजीराजे छत्रपती यांच्या लढ्याला यश


 

First Published on: February 28, 2022 6:36 PM
Exit mobile version