ट्रेडींगमधून साधा रोजगाराची संधी

आजच्या आधुनिक काळातही अशी काही कार्यक्षेत्र आहेत जिथे महिलांच्या तुलनेत पुरुषांचेच वर्चस्व कायम आहे. शेअर मार्केट, स्टॉक मार्केट हे देखील यापैकीच एक क्षेत्र. मात्र केवळ आत्मविश्वास, सकारात्म दृष्टीकोन आणि व्यासंगी अभ्यास याच्या जोरावर मुक्ता धामनकर या मराठमोळ्या महिलेने ट्रेडींगच्या दुनियेत स्वत:ची नवीन ओळख निर्माण केली आहे.