चंद्रशेखर बावनकुळे यांच्याऐवजी भाजपकडून टेकचंद सावरकर अधिकृत उमेदवार

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याऐवजी भाजपकडून टेकचंद सावरकर अधिकृत उमेदवार

कामठी मतदारसंघातून टेकचंद सावरकर भाजपचे अधिकृत उमेदवार

खडसे, मेहता, तावडे यांच्याप्रमाणेच उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारीच्या बाबतीत पक्षाने धक्का दिला आहे. शेवटच्या दिवसापर्यंत यादीत नाव येत नसल्यामुळे बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती यांनी कामठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केला होता. अर्ज सादर करताना त्यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे हजर नव्हते. अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या काही तास आधी भाजपने कामठी मतदारसंघातून टेकचंद सावरकर यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाला दिल्लीतून आणि विशेषत: अमित शहांचा विरोध असल्याचं देखील सांगितलं जात आहे.

भाजप डॅमेज कंट्रोल मोडमध्ये?

भाजपने उमेदवारांची शेवटची यादी सकाळी जाहीर केल्यानंतर प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि राज पुरोहित या दिग्गज नेत्यांचे तिकीट कापले. त्यानंतर या नेत्यांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचे पाहायला मिळाल. घाटकोपर पूर्वमध्ये तर प्रकाश मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी पराग शहा यांची गाडीच फोडली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये रोष वाढत असताना त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभीमीवर भाजपकडून नाराजी दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात असल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे.

First Published on: October 4, 2019 5:13 PM
Exit mobile version