Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenBarfi : सणा-सुदीला बनवा रवा-नारळ बर्फी

Barfi : सणा-सुदीला बनवा रवा-नारळ बर्फी

Subscribe

अनेकांना गोड खाण्याची सवय असते. तर बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खावेसे वाटते. अशावेळी तुम्ही घरी बनवलेली रवा नारळ बर्फी नक्की ट्राय करु शकता.

साहित्य : 

  • 1 मोठे चमचे तूप
  • 1/4 कप रवा
  • 1/2 कप खवलेला नारळ
  • 2 कप दूध
  • 1/4 कप साखर
  • 1 लहान चमचा वेलची पावडर
  • पिस्ताचे काप

कृती : 

Sooji with coconut sweet recipe

- Advertisement -
  • सर्वप्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करावे त्यात मंद आचेवर रवा भाजून घ्यावा.
  • रवा भाजल्यानंतर त्यात नारळाचा किस घालावा. हे मिश्रण 3 ते 5  मिनिटे आचेवर परतून घ्यावे.
  • त्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये दूध उकळून त्यात रवा-नारळाचे मिश्रण घालावे. हे मिश्रण एकजीव करून घ्यावे.
  • तसेच या मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी त्यानंतर त्यात साखर आणि वेलची पावडर टाकून मिश्रण पुन्हा एकजीव करावं.
  • त्यानंतर ताटाला थोडं तूप लावावं, यात हे मिश्रण व्यवस्थित पसरून ठेवावं.
  • हा ट्रे फ्रिजमध्ये थंड होऊ द्यावा. त्यानंतर या मिश्रणाचे चौकनी काप करावे आणि पिस्त्यांच्या काप्याने गार्निश करुन घ्यावा.

हेही वाचा :

Paneer Tikka : सुट्टीच्या दिवशी घरच्यांसाठी बनवा चटपटीत पनीर टिक्का

- Advertisment -

Manini