घरदेश-विदेशNCP Crisis : स्वतः निवडून न येणारे इतरांच्या नेमणुका कशा करू शकतात?...

NCP Crisis : स्वतः निवडून न येणारे इतरांच्या नेमणुका कशा करू शकतात? दादा गटाचा पवारांवर थेट हल्ला

Subscribe

2019 नंतर राज्यातील राजकारणात कधी काय घडेल काहीच सांगता येत नाही आणि त्याचा अंदाजही लावू शकत नाही. याचा अनुभव महाविकास आघाडी स्थापनेपासून राज्याला आलेला आहे.

नवी दिल्ली : शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे एकमेंकाविरोधात उभे ठाकले असून, पक्ष कुणाचा? याबाबत संघर्ष करीत आहेत. असे जरी असले तरी आता अजित पवार गटाने शरद पवारांवर थेट हल्ला करत त्यांना डिवचलं आहे. (NCP Crisis How can those who are not elected themselves appoint others Dada group direct attack on Pawar)

2019 नंतर राज्यातील राजकारणात कधी काय घडेल काहीच सांगता येत नाही आणि त्याचा अंदाजही लावू शकत नाही. याचा अनुभव महाविकास आघाडी स्थापनेपासून राज्याला आलेला आहे. असे असतानाच शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरू झाली असून, शरद पवार आणि अजित पवार हे थेट एकमेंकांवर आरोप करीत आहेत. एकुणच पक्ष आणि चिन्हासाठी महाराष्ट्रातील पवार घराणं पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : NCP CRISIS : ‘आमचीच प्रतिज्ञापत्र खरी’; अजित पवार गटाचा निवडणूक आयोगात दावा

शरद पवारांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह

निवडणूक आयोगात आज अजित पवार गटाकडून युक्तीवाद केल्या जात आहे. या युक्तीवादात अजित पवार गटाकडून शरद पवारांना लक्ष केले जात आहे. या युक्तीवादात शरद पवारांना उद्देशून आक्षेप घेतले जात आहेत. शरद पवारांनी पक्ष घरासारखा चालवला, पक्षामध्ये नियमांचं पालन केलं जात नव्हतं, असं अजित पवार गटाच्या वकिलांनी नमूद केलं. विशेष म्हणजे शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरच आक्षेप घेण्यात आला. स्वतः निवडून न येणारे इतरांच्या नेमणुका कशा करु शकतात? असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तेव्हा आता शरद पवारांकडून अजित पवार गटाला काय उत्तर मिळते हे पहावे लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Sharad Pawar: दसऱ्याच्या दिवशी पुण्यात शरद पवार यांची जाहीर सभा; युवा संघर्ष यात्रेची होणार…

हे वकील करत आहेत दोन्ही गटाकडून युक्तिवाद

निवडणूक आयोगात सुरू असलेल्या पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणीत दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद केल्या जात आहे. यामध्ये अजित पवार गटाकडून adv. निरज किशन कौल आणि मनिंदर सिंह हे युक्तिवाद करत आहेत. तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -