Monday, April 29, 2024
घरमानिनीBeautyBeauty : उन्हाळयात वापरा 'हे' 3 फेस मास्क, स्किनवर येईल चमकदार ग्लो

Beauty : उन्हाळयात वापरा ‘हे’ 3 फेस मास्क, स्किनवर येईल चमकदार ग्लो

Subscribe

उन्हाळयात चेहऱ्याची स्किन खूप डल आणि काळी होते. चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी मोसमी फळांचं वापर करा. जेणेकरून त्वचा छान राहील आणि त्वचेला एक ग्लो येईल ज्यामुळे त्वचा खराब होणार नाही. त्वचा निरोगी आणि मॉइश्चरायझ ठेवण्यासाठी घरगुती पद्धतीने फेस मास्क तुम्ही ट्राय करू शकतात. हवामान बदलले की चेहऱ्यावर अनेक बदल दिसू लागतात. कधी मुरुमांची समस्या, कधी चिकटपणा. अशा सर्व समस्या टाळण्यासाठी आणि त्वचेला कूलिंग इफेक्ट देण्यासाठी उन्हाळ्यात या हंगामी फळांपासून फेस मास्क तयार करून त्वचेला हायड्रेट ठेवता येते.

Use Fruit Face Mask For Instant Glowing Skin Skin Care Tips | Hindi News, चेहरे में नई जान फूंक देते हैं ये फल, मिलेगी ऐसी चमकदार त्वचा हर कोई लगेगा फीका

- Advertisement -

उन्हाळ्यात त्वचेला कूलिंग इफेक्ट देण्यासाठी, अशा प्रकारे लावा हे फेस पॅक

1. एवोकॅडो आणि मध-

- Advertisement -

चेहरा सुंदर ठेवण्यासाठी अॅव्होकॅडो हा एक उत्तम फळ आहे. या सुपरफूडमध्ये फळामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड देखील भरपूर असते. जीवनसत्त्वे ए, डी आणि ई या फळामध्ये आढळतात, जे त्वचेचे पोषण करण्याचे काम करतात. याशिवाय यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करतात. एवोकॅडो आणि मधाचा फेसमास्क चेहऱ्यावर लावल्याने चेहरा छान सुरक्षित राहतो. याशिवाय आपल्या त्वचेवरील डागही निघू लागतात.

10 Homemade Avocado Facial Masks For Glowing Skin - LifeHack

असा लावा हा फेस मास्क-

  • हा फेस पॅक लावण्यासाठी सामान्य पाण्याने किंवा गुलाब पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
  • त्यानंतर एवोकॅडोचे बिया काढून दोन चमचे लगदा मॅश करा.
  • मॅश करताना गुठळ्या राहू नयेत हे लक्षात ठेवा. मग त्यात एक चमचा मध टाका. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा.
  • आता 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा.
  • उन्हाळ्यात होणारा चिकटपणा दूर करण्यासाठी हे फेस पॅक खूप फायदेशीर आहेत.

2. पपई, कॉफी आणि लिंबाचा रस-

अँटिऑक्सिडेंट्सने युक्त पपई चेहऱ्याला ग्लो आणतो. व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असल्याने चेहऱ्याची त्वचा मऊ होते. यामध्ये असलेले पॅपेन एंझाइम चेहऱ्यावरील अकाली रेषा आणि सुरकुत्या दूर करण्यास मदत करते. दुसरीकडे, लिंबाच्या रसामध्ये असलेले तत्व उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या दूर करते. पपई, कॉफी आणि लिंबू फेस मास्क त्वचेची हरवलेली चमक परत आणण्यासाठी काम करू शकतात.

5 Benefits Of Papaya Face Pack For Skin - Oshea Herbals

असा लावा हा फेस पॅक-

  • फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा.
  • त्यानंतर एका भांड्यात पपईचा लगदा घ्या. त्यात एक चमचा कॉफी आणि एक चमचा लिंबाचा रस घाला.
  • हे मिश्रण चांगले मिसळा आणि जाडसर पेस्ट तयार करा.
  • आता हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. यामुळे डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा एक्सफोलिएट होईल.
  • 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावल्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा . यामुळे चेहऱ्यावरील चमक कायम राहील.

3. आंबा आणि दही मास्क-

लॅक्टिक अॅसिडने भरपूर दही आपली त्वचा मऊ ठेवते. यातील एन्झाइम्स त्वचेला नरम ठेवतात. यामुळे त्वचेवरील कोरडेपणाची समस्या टाळता येते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी त्वचेसाठी लोशनचे काम करते. त्याचबरोबर आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढवते. याशिवाय यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला हायड्रेट ठेवतात.

10 Best Homemade Mango Face Packs For Healthy Skin

असा लावा हा फेस मास्क-

  • एका भांड्यात दोन चमचे आंब्याचा पल्प मॅश करा. आता त्यात दही आणि एक चमचा मध मिसळा .
  • या तीन गोष्टी मिक्स करून चेहऱ्याला लावा.
  • हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.
  • या फेस मास्कमुळे चेहऱ्याची त्वचा उन्हापासून सुरक्षित राहते आणि त्वचेची लवचिकता टिकून राहते.
  • त्यामुळे त्वचेवरील डागही दूर राहतात.
  • हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर लावू शकता.
  • यामध्ये असलेल्या घटकांच्या मदतीने त्वचेला टॅनिंगची समस्या देखील टाळता येते.

हेही वाचा : उन्हाळ्यात नितळ त्वचेसाठी टॉमॅटोचे ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा

- Advertisment -

Manini