Thursday, May 9, 2024
घरमानिनीHealthफळे आणि भाज्या खा, हार्ट प्रॉब्लेम आणि कॅन्सर दूर ठेवा

फळे आणि भाज्या खा, हार्ट प्रॉब्लेम आणि कॅन्सर दूर ठेवा

Subscribe

आपण कायमच घरातील मोठ्या मंडळींकडून ऐकत आलो आहोत की, हिरव्या भाज्या आणि ताजी फळे खा आणि निरोगी राहा. सकस आहार केल्याने आजार आसपासही येणार नाही असे आपण ऐकतच मोठे झाले आहोत. तज्ज्ञांच्या मते, दैनंदिन आहारात फळांचा समावेश केल्याने शरीर तंदुरूस्त आणि सक्रिय राहते, फळे खाल्याने मानसिक आरोग्यही निरोगी राहते. फळे आणि भाज्या खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत तर राहतेच शिवाय हार्टचे आरोग्य सुधारते आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारालाही दूर ठेवता येते.

पचनसंस्था सुधारते – फळे फायबर आणि एन्झाइमसाचे भांडार आहे. फायबर शरीराची पचनक्रिया सुधारते आणि एन्झाइम्स प्रथिनांना उर्जेत रूपांतरित करतात. त्यामुळे फळे नियमित खाल्याने पचनक्रिया सुधारते.

- Advertisement -

रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते – प्रत्येक ऋतूत मिळणारी फळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यसाठी फायदेशीर असतात. रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी संत्री, द्राक्षे यासारखी आंबट फळे अवश्य खावीत. जे अनेक आजारांपासून आणि संक्रमणापासून संरक्षण करतात.

- Advertisement -

वजन नियंत्रणात राहते – इतर पदार्थांच्या तुलनेत फळांमध्ये कमी कॅलरीज असतात. याशिवाय फळांमध्ये फायबर आणि भरपूर पाणी असते. त्यामुळे रोजच्या आहारात फळांचा समावेश केल्यास वजन नियंत्रणात राहते.

रक्तातील साखर वाढत नाही – फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी शरीराला हानी पोहचवत नाही. फळांमध्ये भरपूर फायबर आणि अनेक पोषक घटक आढळतात यामुळे ही साखर रक्तात शोषली जात नाही. परिणामी, रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.

हार्टचे आरोग्य सुधारते – सर्व फळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. या ऑक्सिडेटिव्ह पदार्थामुळे तुमची त्वचा चमकदार बनते. हे पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून आराम देते. परिणामी, हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हार्ट रिलेटेड अन्य आजारांचा धोका टाळता येतो.

एका संशोधनानुसार, रोजच्या आहारात दोन फळे आणि तीन भाज्या यांचा समावेश केला तर आयुष्य अधिक वाढू शकते. प्रत्येकाने हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन सी आणि बीट केरोटीन असलेली फळे खावीत. त्वचा, केस आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी फळे आणि भाज्या उपयुक्त ठरतातच. याशिवाय हार्ट स्ट्रोक आणि कँसर सारख्या गंभीर आजारांपासूनही संरक्षण करतात.

 

 

 


हेही वाचा : एक समोसा खाल्ल्याने किती कॅलरी वाढते? त्याचे परिणाम काय होतात

 

- Advertisment -

Manini