Thursday, April 25, 2024
घरमानिनीHealthएक समोसा खाल्ल्याने किती कॅलरी वाढते? त्याचे परिणाम काय होतात

एक समोसा खाल्ल्याने किती कॅलरी वाढते? त्याचे परिणाम काय होतात

Subscribe

भारतीय स्ट्रीटफूडपैकी एक अत्यंत लोकप्रिय असलेला म्हणजे समोसा. समोसा बटाटा, वाटाणे आणि विविध मसाल्यांच्या मिश्रणापासून बनविण्यात येतो. समोसा अनेकांना केचप आणि चटणीसोबत खायला आवडतो. त्याची कुरकुरीत आणि मसालेदार चव लोकांना इतकी आवडते की ते वाढणाऱ्या कॅलरीजचा विचारही करत नाही. मात्र, निरोगी राहायचे असेल तर सामोसा खाल्यानंतर शरीराला किती कॅलरी, किती फॅट्स मिळतात यांचा आरोग्यावर कसा परिणाम होतो हे माहित असायला हवे.

कॅलरीज – 262
फॅट्स – 17 ग्राम
कार्ब – 24 ग्राम
फायबर – 2.1 ग्रॅम
साखर – 1.6 ग्राम
प्रोटिन्स -3.5 ग्राम
कोलेस्ट्रॉल – 27 मिलिग्रॅम
सोडियम – 423मिलिग्रॅम
पोटॅशियम – 189 मिलिग्रॅम
कॅल्शियम -2%
आयर्न – 4 %

- Advertisement -

समोस्यामध्ये कॅलरी आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप जास्त असते. असे असले तरी समोसा चव घेण्यासाठी आणि अधूनमधून स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. मात्र जेव्हा तुम्ही सामोसा खाल त्यानंतर कमी कॅलरीज असणारे पदार्थ खायला हवेत.

हेल्दी समोसे कसे बनवायचे –

- Advertisement -
  1. समोसे डीप फ्राय करण्याऐवजी बेक करा किंवा एअर फ्राय करा.
  2. हवे असल्यास समोसा तळण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर करा.
  3. मैदा वापरण्याऐवजी रवा किंवा इतर पिठाचा वापर तुम्ही करू शकता.
  4. सामोस्यात बटाटाऐवजी पनीर, मटार, डाळी आदी सामग्री तुम्ही वापरू शकता.

एका दिवसात किती सामोसे खाऊ शकता?

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारात समोशाचा समावेश कधीच करू नये. हे आरोग्यसाठी आरोग्यदायी मानले जात नाही. मात्र जर तुम्ही हेल्दी पद्धतीने समोसे बनवत असाल तर तुम्ही एक समोसा खाऊ शकता. याशिवाय पार्टीत किंवा कोणत्याही फॅक्शनमध्ये समोसा खाणार असला तर त्याच्या प्रमाणावर लक्ष द्या. समोसाची चव चांगली असते पण, याच अर्थ असं नाही की, ते निरोगी आहे. जर तुम्ही आठवड्यातून अनेक वेळा समोसे खाल्लेत तर आरोग्यावर याचा गंभीर
परिणाम होतो. ऍसिडिटी, पॉट फुगणे अशा समस्या उदभवतात. त्यामुळे कमीत कमी सामोसे खाण्याचा प्रयन्त करा. जर तुम्हाला सामोसा खायला आवडत असेल तर घरी तयार केलेला सामोसा खाणे उत्तम पर्याय ठरू शकतो.

 

 

 


हेही वाचा : फ्रोझन फूडमुळे कॅन्सर, मधुमेहाचा धोका

 

- Advertisment -

Manini