घरक्राइमBribery : लाचखोरांचाच फुलतोय मळा, सर्वसामान्यांचा आवळतोय गळा; संभाजीनगरमध्येही वाढली लाचखोरी

Bribery : लाचखोरांचाच फुलतोय मळा, सर्वसामान्यांचा आवळतोय गळा; संभाजीनगरमध्येही वाढली लाचखोरी

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा विभाग म्हणून ओळख असलेल्या मराठवाडा विभागात 2024 या वर्षातही लाचखोरी काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. कारण मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड विभाग हा पुणे आणि नाशिक विभागानंतर लाचखोरीत अव्वल असल्याचे चित्र मार्च महिन्यापर्यंतच्या कारवाईतून दिसून येत आहे. (The flower of the bribers is flourishing the common mans throat is throbbing Bribery also increased in Sambhajinagar)

हेही वाचा – Mahayuti Seat Sharing : भाजपाकडून 23 उमेदवार घोषित, 9 ठिकाणी थेट लढत; मात्र शिंदे-अजित पवार गटाचं काय?

- Advertisement -

सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आणि अडकलेली कामे तत्काळ निकाली काढण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत स्तरापासून थेट मंत्रालयापर्यंत विविध शासकीय कार्यालयांची रचना करण्यात आली आहे. परंतु याच कार्यालयातील असंख्य लाचखोर सर्वसामान्यांची कामे करून देण्यासाठी चिरीमिरी करताना दिसून येतात. कारण, राज्यात 1 जानेवारी ते 17 मार्च 2024 या कालावधीत राज्यातील आठ विभागात तब्बल 157 सापळ्यांमध्ये 232 लाचखोरांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. यामध्ये पुणे विभागात 31 सापळ्यांध्ये 45 लाचखोर, तर नाशिक विभागात 34 सापळ्यांमध्ये 47 लाचखोर अटक करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर विभाग अव्वल

मराठवाड्यात दोन विभाग असून, एक छत्रपती संभाजीनगर तर दुसरा नांदेड विभाग आहे. या दोन विभागात 2024 या वर्षातील अडीच महिन्यातच लाचखोरीच्या मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात 27 सापळ्यांमध्ये तब्बल 50 लाचखोर अटक करण्यात यश आले असून, नांदेड विभागात 12 सापळ्यांमध्ये 17 लाचखोर अटक करण्यात आले आहेत हे विशेष.

- Advertisement -

हेही वाचा – Wedding invitation viral : लग्नात भेटवस्तू नको, पण मोदींना मतदान करा; वराच्या वडिलांची अनोखी मागणी

नांदेड विभागात अपसंपदेचा एक गुन्हा दाखल

लाचखोरीबरोबरच मराठवाडा विभागातील नांदेड विभागात अपसंपदेचा एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये एका गुन्ह्यात दोन आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची लाचखोरांवर करडी नजर असल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक काळातही विशेष लक्ष

देशभरात लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, या काळात देशासह राज्यातील लाचखोरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विशेष लक्ष असणार आहे. यासोबतच हवालाच्या रक्कमेवरही पोलीस प्रशासनाचे लक्ष असणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – PHOTO : रंग आनंदाचे, क्षण कुटुंबसौख्याचे…; मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासोबत साजरी केली धुळवड

अशी आहे लाचखोरीची आकडेवारी

परिक्षेत्र – सापळा – आरोपी
छ. संभाजीनगर – 27 – 50
नांदेड – 12  – 17
अपसंपदा – 1 – 02

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -