Tuesday, May 21, 2024
घरमानिनीDiabetes : डायबेटिस असणाऱ्यांसाठी ही फळं अपायकारक

Diabetes : डायबेटिस असणाऱ्यांसाठी ही फळं अपायकारक

Subscribe

फळे शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा एक चांगला स्रोत आहे. फळांच्या सेवनाने शरीरातील फायबरची कमतरताही पूर्ण करण्यात येते. डॉक्टर कायमच फळे खाण्याचा सल्ला देतात. फळे खाल्याने व्यक्ती हृदयरोग, कॅन्सर, डायबिटीस सारख्या आजारांपासून सुरक्षित राहतो. पण, काही आजारांवर फळे योग्य मानण्यात येत नाही. त्यापैकी एक म्हणजे डायबिटीस. डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात फळांचे सेवन केले तर ते त्यांच्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते.

डायबिटीस रुग्णांच्या शरीरावर काय परिणाम होतो?

- Advertisement -
  1. फळांमध्ये उच्च प्रतीचे फ्रुक्टोज आढळते. हे लिव्हरद्वारे शोषले जाते आणि त्याचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. ग्लुकोजमध्ये रूपांतर झाल्यानंतर ते रक्तात सोडले जाते. परिणामी, जास्त प्रमाणात फळांचे सेवन केल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते.
  2. अँटीऑक्सीडेंट्स आणि फायटोकेमिकल्ससमृद्ध फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. काही फळे डायबिटीसच्या रुग्णांना हानी पोहचवू शकतात, तर काही डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.
  3. काही फळांच्या सेवनाने शरीरात टाईप-2 डायबिटीस वाढण्याचा धोका टाळता येतो.

डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर फळे –

डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फळांचे सेवन करावे. वास्तविक, ज्या फळांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते अशी फळे रक्तात साखर सोडण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे डायबिटिसच्या रुग्णांना कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे खाण्याचा सल्ला दिला जातो.

- Advertisement -

कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे- चेरी, द्राक्षे, सफरचंद, नासपती, पेरू, किवी, अंजीर, पपई आणि वाळलेले जर्दाळू.

या फळांमध्ये साखरेचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याचे आढळते. जे रक्तातील साखरेची पातळी कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतात.

या फळांचे सेवन टाळावे – डायबिटीस रुग्णांनी कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे प्रमाण जास्त असणारी फळे खाणे टाळावीत. यात आंबा, चिकू, केळी, अननस, फणस अशी फळे समाविष्ट आहेत. त्यामुळे ही फळे खाल्लीत तरी ती मर्यादित प्रमाणात खावी कारण या फळांच्या नियमित सेवनाने शरीराला हानी पोहचू शकते.

 

 

Edited By – Chaitali Shinde


हेही पहा : बॉडी मसाजचे फायदे आणि करण्याची सर्वोत्तम वेळ

 

 

- Advertisment -

Manini