Thursday, May 9, 2024
घरमानिनीHealthजेवण झाल्यावर फळं खाल तर आजारी पडाल

जेवण झाल्यावर फळं खाल तर आजारी पडाल

Subscribe

अनेकांना जेवण झाल्यानंतर फळं खाण्याची सवय असते. पण, एका संशोधनानुसार जेवण झाल्यावर काही फळे खाणे टाळले पाहिजे कारण या फळांच्या सेवनाने शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. संत्री, द्राक्षे ही फळे एका विशिष्ट चवीसाठी प्रसिद्ध आहेत. या फळांमध्ये अँटी-ऑक्सीडेन्ट असतात. ज्याने कॉलेजन वाढण्यास मदत मिळते. या आंबट चवीच्या फळांचे अनेक फायदे असले तरी जेवणानंतर ही फळे खाणे योग्य मानण्यात येत नाही.

आंबटवर्गीय फळांमध्ये डायटरी फायबर असते. यांच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत मिळते शिवाय पोट निरोगी राहून पचनक्रिया निरोगी राहते. यात असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटी ऑक्सीडेंट्स शरीर निरोगी ठेवतात. पण, जेवणानंतर ही फळे खाणे योग्य मानले जात नाही. जाणून घेऊयात जेवणानंतर आंबट फळे खाल्याचे दुष्परिणाम ,

- Advertisement -

ॲसिडिटीची समस्या उदभवते –

- Advertisement -

आंबटवर्गीय फळे आम्लयुक्त असतात आणि दुपारच्या जेवणानंतर ही फळे खाल्याने पचनक्रिया बिघडण्याची शक्यता अधिक असते. ॲसिडिटीमुळे अस्वस्थता, अपचन किंवा जळजळीची समस्या जाणवू लागतात.

पोषक द्रव्यांच्या शोषणात अडथळा येणे –

आंबटवर्गीय फळांमध्ये असणाऱ्या काही संयुगांमुळे जेवल्यानंतर ही फळे खाल्याने पोषक द्रव्यांच्या शोषणात अडथळा निर्माण होतो. याने शरीरात आवश्यक असणाऱ्या मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सची कमतरता भासते.

अपचन होणे –

जेवणानंतर आंबटवर्गीय फळे खाल्यास काही व्यक्तींना ओटीपोटात दुखणे, सूज किंवा गॅस होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेष म्हणजे ज्यांची पचनसंस्था संवेदनशील आहे त्यांनी जेवणानंतर आंबट फळे खाणे टाळले पाहिजे.

 


हेही वाचा ; काकडी खाण्याची योग्य वेळ कोणती?

- Advertisment -

Manini