हिंदू धर्मात देवी-देवातांच्या नियमित पूजेसोबतच त्यांच्या मंत्राचं आणि स्तोत्रांचं पठण करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं. आठवड्यातील प्रत्येक वार वेग-वेगळ्या देवी-देवातांना समर्पित करण्यात आला आहे. सोमवार आणि महिन्यातील प्रदोष व्रत भगवान शंकराला समर्पित करण्यात आले आहे. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण शिव पंचाक्षर मंत्राचा जप करतात. हिंदू पुराणांनुसार, नियमित शिव पंचाक्षर मंत्राचा जप केल्याने व्यक्तिच्या मनोकामना पूर्ण होतात.
शिव पंचाक्षर मंत्र
ॐ नम: शिवाय
शिव पंचाक्षर मंत्राचा जप केल्याने होतात ‘हे’ फायदे
- नियमित शिव पंचाक्षर मंत्राचा जप केल्याने मनातील सर्व इच्छा होतात.
- हा मंत्र भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे, जो त्याचा जप करतो त्याला दीर्घायुष्य मिळते.
- या मंत्राचा जप केल्याने आरोग्य समस्या दूर होतात. असाध्य रोग देखील नष्ट होतो.
- समाजात पद-प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी देखील या मंत्राचा जाप केला जातो.
- या मंत्राच्या प्रभावाने साधकाला ऐहिक सुख, इच्छित फळ प्राप्त होतात. या मंत्राचा भक्तिभावाने जप केल्यानेच मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळते.
- पंचाक्षर मंत्राने अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते.
- या मंत्राचा जप केल्याने धन-संपत्ती संबंधित समस्या दूर होतात.
- Advertisement -
हेही वाचा :
Mahamrutunjay Mantra : महामृत्युंजय मंत्राचा जप का करावा? ‘हे’ आहेत फायदे
- Advertisement -
- Advertisement -