Wednesday, May 1, 2024
घरमानिनीKitchenRecipe : नाचणीचे कटलेट

Recipe : नाचणीचे कटलेट

Subscribe

अनेकदा पोहे, उपमा हे तेच तेच पदार्थ खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही नाचणीचे कटलेट नक्की ट्राय करा.

साहित्य :

  • 1 वाटी मोड आलेली नाचणी
  • 2 उकडलेले बटाटे
  • 1 मोठा चमचा बेसन
  • 1 चमचा लाल मिरची पावडर
  • 1 चमचा धणे पावडर
  • 1 चमचा जिरे पावडर
  • 1 चमचा गरम मसाला पावडर
  • पाव चमचा साखर
  • 1 वाटी कोंथिबीर
  • 1 कोवळा पातीचा कांदा
  • 1 वाटी पोहे
  • चवीपुरते मीठ
  • तळण्यासाठी तेल

कृती :

Yummy Veg Cutlet Recipe | The Bengal Recipe - BON Masala

- Advertisement -
  • सर्वप्रथम मोड आलेली नाचणी मिक्सरला थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घ्यावी.
  • त्यानंतर एका पातेल्यात घेऊन, त्यात उकडलेले बटाटे कुस्करून घालावेत.
  • नंतर त्यात बेसन आणि सर्व मसाले घालावेत. त्यानंतर पातीचा कांदा, तसेच कोथिंबीर बारीक चिरून घालावी.
  • चवीपुरते मीठ घालून मग सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
  • पोहे मिक्सरला सरसरीत वाटून घ्यावे. या मिश्रणात घालून एकत्र करावे. त्यामुळे मिश्रणाला घट्टपणा येईल.
  • फ्राय पॅनमध्ये थोडे तेल घालून छोटे छोटे कटलेट शॅलो फ्राय करावेत.
  • हे पौष्टिक कटलेट खूप चविष्ट आणि कुरकुरीत लागतात.
  • हे हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करावे.

हेही वाचा :

Recipe : नाचणीचा उपमा

- Advertisment -

Manini