Sunday, April 28, 2024
घरमानिनीReligiousतुळस गिफ्ट देणं शुभ की अशुभ?

तुळस गिफ्ट देणं शुभ की अशुभ?

Subscribe

हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र आणि पूजनीय मानले जाते. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. असं म्हणतात की, नियमीत तुळशीची पूजा केल्याने घरामध्ये सुख-समृद्धी नांदते. असं म्हणतात ज्या घरातील तुळस नेहमी हिरवीगार असते. तिथे अधिक सकारात्मक ऊर्जा असते. तुळशीची पूजा केल्याने देवी लक्ष्मीसोबतच नारायणांचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. वास्तु शास्त्रामध्ये देखील तुळशीला खूप महत्व देण्यात आले आहे. अनेकजण कार्यक्रमांमध्ये तुळस गिफ्ट म्हणून देतात. परंतु तुळस गिफ्ट म्हणून देणं शुभ आहे की अशुभ हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

- Advertisement -

तुळस गिफ्ट देणं शुभ की अशुभ?

Gifting Tulsi saplings | Tulsi, Saplings, Gifts

 

- Advertisement -
  • वास्तु शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीला तुळस गिफ्ट म्हणून देणं शुभ मानलं जातं. यामुळे गिफ्ट आणि गिफ्ट घेणाऱ्या व्यक्तीमध्ये चांगले संबंध राहतात.
  • तुळस गिफ्ट केल्याने श्री विष्णूंसोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो.
  • तुळस गिफ्ट केल्याने बुध ग्रह मजबूत होतो. ज्या व्यक्तींचा बुध ग्रह कमजोर आहे. त्यांनी बुधवारी तुळशीचे दान करावे.

तुळस गिफ्ट करण्याचे नियम

tulsi puja benefits tulsi plant starts withering because of this know benefits of tulsi pujan tvi | Tulsi Puja Benefits: तुलसी का पौधा मुरझा रहा? ये हो सकती है वजह, जानें पूजा

  • तुळस गिफ्ट करणं शुभ असलं तरी त्यापूर्वी तिच्या नियमांचे पालन अवश्य करावे.
  • कधीही एकादशीच्या दिवशी आणि रविवारी तुळस गिफ्ट देऊ नये. कारण यादिवशी तुळशीला स्पर्श करण्यास शास्त्रात अशुभ मानलं जातं.
  • तुळस खूप पवित्र मानली जाते. त्यामुळे एखाद्याला गिफ्ट देताना तिचे पावित्र्य राखावे.
  • जो तुळशीची योग्य काळजी घेऊ शकेल अशाच व्यक्तीला तुळस गिफ्ट द्यावी.

 


हेही वाचा : Vastu Tips : तुळशी शेजारी कधीही ठेऊ नयेत ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini