Monday, May 6, 2024
घरमानिनीFashionMehndi Tips : मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी करा 'हे' उपाय

Mehndi Tips : मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Subscribe

लहान मुलगी असो व मोठ्या स्त्रिया , सर्वांनाच मेहंदी (Mehndi) लावणे खूप आवडतं. मेहंदी तुमच्या सौंदर्यात तर भर घालतेच. हातावर मेहंदी काढताना डाय अथवा अन्य रासायनिक स्वरूपातील मेहंदीचा वापर करण्यापेक्षा मेहंदीचा रंग अधिक गडद करण्यासाठी तुम्ही सोप्या घरगुती पद्धतीचा वापर करू शकता.

मेहंदी बराच वेळ राहू द्या

मेहंदी लावणे हे जितके कष्टाचे काम आहे, तितकेच ती दीर्घकाळ लागू ठेवण्यासाठीही संयम लागतो. मेंदी लावण्यापूर्वी आपले हात चांगले धुवा. मग तुमची आवडती मेहंदी हातावर सजली की सात-आठ तास राहू द्या.

- Advertisement -

लिंबू-साखर रस

लिंबू-साखर रस हा मेंदीचा रंग गडद करण्याचा सोपा उपाय आहे. पाण्यात थोडी साखर टाका, उकळवा आणि थंड होऊ द्या. आता हे मिश्रण एका भांड्यात काढा आणि त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. मेहंदी सुकल्यानंतर हे मिश्रण लावा.

लवंगाच्या धूराने हातांना वाफ द्या

जेव्हा तुमची मेहंदी सुकेल तेव्हा एका लहानशा पॅनमध्ये लवंगा घ्या आणि गरम करा. यातून धूर निघायला लागल्यावर हाताचे तळवे थोड्या अंतरावर ठेऊन ती वाफ हातावर घ्या. गडद रंग येण्यासाठी साधारण ३-४ वेळा असं करा. तुम्ही धुरी घ्यायला जमत नसेल तर तुम्ही लवंगेचे तेलही वापरू शकता. लवंग तेल कोमट करून तुम्ही हाताला लावा.

- Advertisement -

बाम लावा

हाडांच्या दुखण्यापासून आराम देण्यासोबतच, बाम तुमच्या हातावरील मेहेंदीचा रंगही गडद करू शकतो. नववधू त्यांच्या मेंदीचा रंग अधिक गडद करण्यासाठी मेंदीवर विक्स किंवा टायगर बाम लावतात. लोकांचा असा विश्वास आहे की बाम लावल्याने मेहंदीचा रंग गडद होतो आणि रंग त्वचेत खोलवर जातो.

लोणच्याचे तेल

आंब्याच्या लोणच्याच्या तेलामुळेही मेहंदीचा रंग अधिक गडद होण्यास मदत मिळते. यामध्ये असणाऱ्या मसाल्यांचा अर्क मेहंदी सुकल्यानंतर तुम्ही लावावा. मेहंदी काढून टाकल्यावर थोडेसे लोणच्याचे तेल हातावर घ्यावे आणि हात घासावेत. किमान1-2  तास तरी पाण्यात हात धुऊ नयेत. यामुळे मेहंदी अधिक गडद होऊन टिकते.

_________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -

Manini