घरदेश-विदेशआर्टिफिशियल इंटेलिजेंसपासून जगाला धोका, संयुक्त राष्ट्र सुरक्षेने घेतली तातडीचे बैठक

आर्टिफिशियल इंटेलिजेंसपासून जगाला धोका, संयुक्त राष्ट्र सुरक्षेने घेतली तातडीचे बैठक

Subscribe

संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संयुक्त राष्ट्र सुरक्षेची बैठक पार पडली.

संयुक्त राष्ट्र : आर्टिफिशियल इंटेलिजेंसपासून जगाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जगात शांती आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसला उपयोगात आणण्याआधी त्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून नियमावली बनवणे गरजेचे आहे. यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षेची नुकतीच बैठक पार पडली.

संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संयुक्त राष्ट्र सुरक्षेची बैठक पार पडली. यामध्ये त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंसपासून जगाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसला नियंत्रीत करण्यासोबतच मदत करण्यासाठी एक नव्या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना करण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

एका आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार, एंटोनियो गुटेरेस यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज मी सुरक्षा परिषदेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसबाबत वैश्विक दृष्टीकोण ठेऊन त्याला वापरण्याची मानसिकता बनविण्याचे आवाहन केले. तर आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या उपयोगासाठी आणि त्याला नियंत्रीत करण्यासाठी आपल्याला एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे.

या देशांनी अशा दिल्या प्रतिक्रिया
एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, रशियाने युएनएससीमधील आर्टिफिशियल इंटेलिजेंसला मिळालेल्या बहुमतांविरुद्ध जात अशी शंका उपस्थित केली आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे आमच्याकडे त्याच्यापासून उद्भवणाऱ्या धोक्या संदर्भात आमच्याकडे माहिती आहे. त्यापासून जगात अस्थिरता निर्माण होऊ शकते. तर दुसरीकडे चिनने असा तर्क काढला आहे की, संयुक्त राष्ट्राने विकसनशिल देशांचे विचार यासाठी विचारात घेतले पाहीजे.

- Advertisement -

युद्धात आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वापरावर निर्बंध येणार
एंटोनियो गुटेरेस यांनी सांगितले की, टेक्नॉलॉपासून ज्याप्रमाणात फायदे आहेत त्या प्रमाणात तोटेसुद्धा आहेत. तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा युद्धात घातक शस्त्रासारखा उपयोग करण्यावर 2026पर्यंत बंदी घालण्यात यावी यासाठी तसे कायदे बनविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -