Tuesday, May 21, 2024
घरमानिनीReligiousRam Navami 2024 : रामनवमी आणि शिर्डीचे साईबाबा याचं आहे खास नातं

Ram Navami 2024 : रामनवमी आणि शिर्डीचे साईबाबा याचं आहे खास नातं

Subscribe

हिंदू धर्मात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. या दिवशी श्री रामांचा जन्म झाला होता. त्यामुळे संपूर्ण भारतात हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. आज 17 एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जात असून रामनवमीनिमित्त अनेकजण महाराष्ट्रातील शिर्डीमध्ये साई बाबांच्या दर्शनासाठी उपस्थित आहेत. मात्र, रामनवमीच्या दिवशी अनेकजण साई बाबांच्या दर्शनासाठी का जातात? असा प्रश्न अनेकांना पडतो.

रामनवमी आणि शिर्डीचे साईबाबा यांचे काय कनेक्शन?

Shri Shirdi Sai Baba Temple, Maharashtra - Pujasthan

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील शिर्डीमध्ये साईबाबांच्या मंदिरात तीन दिवस रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. मात्र, रामनवमी आणि साईबाबांचं नेमकं काय कनेक्शन आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खरंतर, पौराणिक मान्यतेनुसार, चैत्र शुक्ल नवमीला म्हणजेच रामनवमीच्या दिवशी साईबाबांचा देखील जन्म झाल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे रामनवमी साईबाबांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो.

साईबाबांच्या जन्माविषयी फारशी माहिती नसल्याने शिर्डी मंदिरात आल्यावर म्हाळसापतीने त्यांना साई हे नाव दिले. साईबाबा 16 वर्षांचे असताना शिर्डीला आले होते. बाबांची जन्मतारीख 28 सप्टेंबर 1835 असावी असा अनेकांचा समज आहे. पण बाबांच्या जन्माची निश्चित तारीख अद्याप समोर आलेली नाही.

- Advertisement -

पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण

रामनवमी उत्सवात पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. 1911 पर्यंत साईबाबांचे येथे वास्तव्य होते. येथे उरूस सुरू झाला. पुढे साईबाबांच्या आज्ञेवरून त्यांचे भक्त भीष्म आणि गोपाळराव गुंड यांनी रामनवमी साजरी करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत येथे हा उत्सव सुरू होतो.


हेही वाचा :

Ram Navami 2024 : रामनवमीला आर्वजून करा रामरक्षा स्तोत्राचे पठण

- Advertisment -

Manini