घरमहाराष्ट्रSanjay Raut : नरेंद्र मोदी 400 पार तर आम्ही 300 पार, संजय...

Sanjay Raut : नरेंद्र मोदी 400 पार तर आम्ही 300 पार, संजय राऊतांचा दावा

Subscribe

पंतप्रधान मोदी 400 पार बोलतात. पण आम्ही इतका दावा आम्ही नाही करणार. परंतु, आम्ही 305 जागांवर नक्की विजयी होणार, असा आम्हाला विश्वास आहे, असे सांगत खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

नागपूर : ‘अबकी बार, मोदी सरकार 400 पार’ असा नारा सत्ताधाऱ्यांकडून देशभरात देण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी एनडीएतील सर्व घटक पक्ष कामाला लागले आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut claims that India will win 305 seats in country)

पंतप्रधान मोदी 400 पार बोलतात. पण आम्ही इतका दावा आम्ही नाही करणार. परंतु, आम्ही 305 जागांवर नक्की विजयी होणार, असा आम्हाला विश्वास आहे, असेही खासदार राऊत यांच्याकडून सांगण्यात आले. रामटेकमधील मविआच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संजय राऊत पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : पुरावे मागण्यात काय अर्थ आहे? सचिन सावंतांनी निवडणूक आयोगाला सुनावले

नागपुरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, परिवर्तनाची सुरुवात विदर्भातून होते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष असले तरी सर्व त्याकडे महाविकास आघाडी म्हणून पाहतो. रामटेकला आमचा उमेदवार नाही, पण आमचे लोक कामाला लागलेत. हळूहळू रंग चढत जाईल. सी व्होटर सर्वेने महाराष्ट्रात महाविकास आघाडीला काही जागा दाखवल्या त्याच्याशी सहमत नाही. महाराष्ट्रात आम्ही 100 टक्के यश मिळवण्याच्या मार्गावर आहोत, असा दावा राऊतांकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

तसेच, देवेंद्र फडणवीस त्यांच्यासाठी 45 प्लसचा आकडा सांगतात. त्यांना आकडे लावण्याची सवय आहे, त्यामुळे ते सध्या तरी काहीही आकडे लावू शकतात. कारण निवडणुकीनंतर भाजपाला आकडे लावायचेच काम करावे लागणार आहे, असा टोला राऊतांनी लगावला आहे. तर, पंतप्रधान मोदी 400 पारचा आकडा सांगत आहेत, पण आम्ही त्यांच्यासारखा दावा करणार नाही. पण इंडिया आघाडी देशामध्ये 305 आणि महाराष्ट्रात 35 जिंकणार, असा आमचा विश्वास असल्याचा दावा पुन्हा खासदार संजय राऊतांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : अमरावतीतील वाद मिटणार? राणा दाम्पत्याच्या भेटीबद्दल अडसूळ म्हणतात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रामटेक लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. या ठिकाणी विद्यमान खासदार कृपाल तुमाणे यांना उमेदवारी न देता राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जर मुख्यमंत्री रामटेकमध्ये असतील तर चांगली गोष्ट आहे. कारण या लोकसभेतून त्यांना त्यांचा उमेदवार बदलावा लागला. हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांनी त्यांच्या विद्यमान खासदारांना उमेदवारी न दिल्याने ते आता रोड शो घेऊ किंवा अजून कोणताही शो करू द्या, त्यांच्या हातात आता काहीही पडणार नाही, असा टोला राऊतांनी लगावला आहे.


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -