चैत्र नवरात्रीची सुरुवात 9 एप्रिलपासून सुरु झाली असून 17 एप्रिल रोजी नवरात्र समाप्त होणार आहे. हिंदू धर्मात चैत्र नवरात्री विशेष महत्त्वपूर्ण आहे. नवरात्रीच्या नवमीला म्हणजेच चैत्र नवमीला संपूर्ण भारतात श्री प्रभू रामचंद्रांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो. यंदा 17 एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान श्रीविष्णूंनी, प्रभू रामचंद्रांच्या रुपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. त्यांच्याच जन्माचा उत्सव म्हणून हिंदू धर्मात रामनवमी साजरी केली जाते.
रामनवमी तिथी
पंचांगानुसार, राम नवमीची तिथी 16 एप्रिल रोजी दुपारी 01:23 पासून सुरू होणार असून 17 एप्रिल दुपारी 03:15 पर्यंत समाप्त होईल. उदयतिथीनुसार, 17 एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाईल.
रामनवमीचा शुभ मुहूर्त
17 एप्रिल रोजी रामनवमीचा शुभ मुहूर्त सकाळी 11:03 पासून ते दुपारी 01:36 पर्यंत असेल.
अशी करा पूजा
- चैत्र नवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
- त्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन देवघरातील देवी-देवतांची पूजा करावी.
- आता एका चौरंगावर लाल वस्त्र अंधरुन श्री रामाचा फोटो ठेवावा.
- श्री रामांना गंध, अक्षता, फुलं, धूप-दीप, नैवेद्य अर्पण करुन त्यांना मनोभावे नमस्कार करावा.
- त्यानंतर रामायण, रामचरिमानस किंवा रामरक्षास्तोत्राचे पठण करावे आणि श्री रामाची आरती करावी.
हेही वाचा :