हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या पूजेला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. फक्त देवी-देवताच नाहीत तर शंख, घंटा, डमरु यांसारख्या वाद्यांची देखील पूजा केली जाते. हिंदू धर्मातील प्रत्येक घरात देव पूजेदरम्यान घंटानाद केला जातो. फक्त देव पूजेतच नाही तर अनेकजण देवाला नैवेद्य अर्पण करताना देखील घंटानाद करतात. पण यामागे नेमके काय कारण आहे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नैवेद्य दाखवताना घंटी का वाजवावी?
पौराणिक ग्रंथानुसार, घंटी वाजवल्याने देवी-देवतांच्या मूर्तीमध्ये चेतना जागृत होते. तसेच घंटानाद केल्याने वायु तत्व जागृत होते. व्यान वायु, उडान वायु, समान वायु, अपान वायु आणि प्राण वायु हे वायु तत्वाचे पाच घटक आहेत. त्यामुळे नैवेद्य दाखवताना या पाच वायु तत्वांचे स्मरण करुन घंटा वाजवली जाते. यामुळे वायु तत्व आणि देवी-देवता जागृत होतात.
नैवेद्य दाखवताना म्हणा हे मंत्र
- ॐ व्यानाय स्वाहा
- ॐ उदानाय स्वाहा
- ॐ अपानाय स्वाहा
- ॐ समानाय स्वाहा
- ॐ प्राणाय स्वाहा
हे मंत्र म्हणत नैवेद्याच्या ताटाभोवती हातात पाणी घेऊन चार वेळा फिरवावे आणि ॐ ब्रह्मअणु स्वाहा असं म्हणत पाणी जमिनीवर सोडावे. असं म्हणतात, अशा प्रकारे नैवेद्य अर्पण केल्यास नैवेद्याचा गंध देवी-देवातांपर्यंत पोहोचतो.
हेही वाचा :