लग्नात वेगवेगळ्या विधी पार पाडल्या जातात. त्यामध्ये मंगळसूत्र उलटं घालणं , वरमाला घालणं आणि अक्षता टाकणं. अशा काही विधींचा समावेश आहे. लग्नात प्रत्येक विधीला खूप महत्त्व असते. हे सर्व विधी नीट पार पडल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून येते. पण कधी विचार केलाय का की लग्नसोहळ्यात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता का टाकतात? त्याचं लग्नात महत्व काय आहे? चला याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात.
अक्षता शब्दाचा अर्थ काय?
लग्नाच्या मुहूर्तावर भटजी मंगलाष्टका बोलण्यास सुरुवात करतो, यावेळी शुभ मंगल सावधान हे मंगलाष्टकेचा शेवटचं कडव पूर्ण होताच नवरा-नवरीच्या डोक्यावर अक्षता टाकल्या आणि त्यांनी एकमेकांना हार घातल्यानंतर त्यांचं लग्न लागलं किंवा पूर्ण झालं असं म्हणतात.
अक्षता का वापरतात?
- तांदुळ हे एक असे धान्य आहे की जे आतून कधीच किडत नाही, म्हणजेच ते आतून शुद्ध आहे. म्हणून तर शुद्ध चारित्र्याला धुतलेल्या तांदळाची उपमा दिली जाते. तांदूळ हे धान्य एकदल धान्य आहे याचे दोन भाग होत नाहीत किंवा ते दुभंगत नाही. आयुष्याचा संसार सुद्धा दुभंगू नये ही त्यामागे भावना असते
- तांदूळ पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावावे लागते, तेव्हा ते खरे बहरते. त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे, आणि नंतर ती दुसऱ्याच्या घरी जाते आणि तेथे बहरते. म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी मानली जाते. असेच मुलीने बहरावे म्हणून अक्षता वापरल्या जातात.
- तसचं तांदळाला सुखाचं आणि सौभाग्य प्रतिक मानलं जातं आणि त्यामुळे नवरा-बायकोवर अक्षता म्हणून तांदूळ टाकले जातात. प्राचीन काळात ग्रीसमध्येही वधू-वरांवर याच कारणासाठी पीठ आणि मिठाई उधळण्याची रीत होती.
- खरंच आपल्या पुरवजांनी आपल्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत, ज्यामुळे आपण या प्रथा जपल्या पाहिजेल.